जागतिक अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक : नाणेनिधीचा इशारा
By admin | Published: February 26, 2016 03:16 AM2016-02-26T03:16:35+5:302016-02-26T03:16:35+5:30
जागतिक अर्थव्यवस्था ‘फारच नाजूक’ स्थितीत असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला असून, या दृष्टीने वाईट आर्थिक स्थिती असलेल्या देशांच्या संरक्षणासाठी नवीन प्रणाली
वॉशिंग्टन : जागतिक अर्थव्यवस्था ‘फारच नाजूक’ स्थितीत असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला असून, या दृष्टीने वाईट आर्थिक स्थिती असलेल्या देशांच्या संरक्षणासाठी नवीन प्रणाली अवलंबिण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक आर्थिक परिस्थितीवर विचार करण्यासाठी जी-२० देशांच्या अर्थमंत्र्यांची शांघाय येथे शुक्रवार-शनिवारी बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी नाणेनिधीने याबाबतचा अहवाल जारी केला असून, त्यात हा इशारा देण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, जागतिक आर्थिक वृद्धी दराची गती मंदावली असून, तेलाच्या घसरत्या किमती आणि अन्य जागतिक संघर्षामुळे बाजारात संकट निर्माण होईल. त्यामुळे वित्तीय स्थिती मार्गावरून घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाढत्या आर्थिक अडचणी व तेलाच्या घसरत्या किमती यामुळे जागतिक आर्थिक सुधारणा होऊ शकणार नाहीत. वाढता धोका नियंत्रणात आणण्यासाठी आणि जागतिक अर्थव्यवस्था समृद्ध करण्यासाठी राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय स्तरावर अधिक ठोस धोरणात्मक उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असेही हा अहवाल म्हणतो.