आधुनिक तंत्रज्ञानामुळेही वाढतेय ग्लोबल वॉर्मिंग
By Admin | Published: March 20, 2016 04:00 AM2016-03-20T04:00:50+5:302016-03-20T04:00:50+5:30
पृथ्वीच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जगभर ‘वसुंधरा दिन’ पाळण्यात आला. यानिमित्ताने जगाच्या विविध भागांत काही वेळ दिवे मालवून हवामान स्वच्छ ठेवण्याचा
पॅरिस : पृथ्वीच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जगभर ‘वसुंधरा दिन’ पाळण्यात आला. यानिमित्ताने जगाच्या विविध भागांत काही वेळ दिवे मालवून हवामान स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जगाशी जोडून घेण्यासाठी आपण वावरत असलेल्या अत्याधुनिक उपकरणांमुळेही पृथ्वीचे तापमान वाढत चालल्याचे एका ताज्या अभ्यासात आढळून आले आहे.
बदलत्या हवामानामुळे पृथ्वीचे अस्तित्व संकटात आले आहे. पृथ्वी वाचविण्यासाठी जगभर १९ मार्चला ‘वसुंधरा दिन’ साजरा केला जातो. यानिमित्ताने जागतिक समुदायांत जनजागृती करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू एफ आणि स्वयंसेवी संघटना यांच्यातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आयफेल टॉवर ते एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि तैपेयी येथे आणि इतरत्र स्थानिक वेळेनुसार रात्री ८.३० वाजता तासाभरासाठी दिवे बंद करण्यात आले.(वृत्तसंस्था)