दूरचित्रवाणीचा पडदा, एलईडी दिवे उजळवणाऱ्यांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:38 AM2023-10-05T05:38:35+5:302023-10-05T05:39:26+5:30
मौंगी बावेंडी, लुई ब्रुस, ॲलेक्सी एकिमोव्ह यांना रसायनशास्त्रातील नोबेल
स्टॉकहोम : तीन शास्त्रज्ञांना सूक्ष्म कणांसंदर्भातील (क्वांटम डॉट) संशोधनाबद्दल रसायनशास्त्रातील यंदाचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (एमआयटी) मौंगी बावेंडी, कोलंबिया विद्यापीठाचे लुई ब्रुस आणि नॅनोक्रिस्टल्स टेक्नॉलॉजी संस्थेत काम करणारे ॲलेक्सी एकिमोव्ह हे पुरस्काराचे संयुक्त मानकरी ठरले. अतिशय तेजस्वी रंगीत किरणे सोडू शकणाऱ्या सूक्ष्म कणांवर त्यांनी संशोधन केले.
नॅनोटेक्नॉलॉजीसाठी संशोधन महत्त्वाचे...
संशोधकांना विश्वास आहे की क्वांटम डॉट्स सूक्ष्म सेन्सर्स, स्लिमर सोलर सेल आणि एन्क्रिप्टेड क्वांटम कम्युनिकेशनमध्ये मदत होईल.
संशोधकांनी संशोधित केलेल्या रासायनिक अभिक्रियेमुळे अशी किरणे निर्माण होतात की, त्याद्वारे एखादा सर्जन ट्युमरवर शस्त्रक्रिया करू शकतो.
श्रेय कुणाला?
याचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय प्रतिमा मिळविण्यात, दूरचित्रवाणी संचाचा पडदा आणि एलईडी दिवे उजळून टाकण्यासाठी होत आहे. १९९३ मध्ये मौंगी बावेंडी यांनी क्वांटम डॉट्सच्या निर्मितीच्या पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणली.
पुरस्कार मिळाल्याने आपण अत्यंत आश्चर्यचकित झालो आहोत. पुरस्कार मिळाल्याने अतिशय सन्मानित वाटत आहे.
- मौंगी बावेंडी,
नोबेल विजेते