अमेरिकेच्या नौदलाचं इंडो-एशिया महासागरात 60 टक्के युद्धनौका उभ्या करण्याचं लक्ष्य
By admin | Published: April 11, 2016 06:42 PM2016-04-11T18:42:54+5:302016-04-11T19:08:43+5:30
अमेरिकेच्या नौदलानं 2019पर्यंत इंडो-एशिया महासागरात जवळपास 60 टक्के युद्धनौका उभं करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.
ऑनलाइन लोकमत
अमेरिका, दि. ११- अमेरिकेच्या नौदलानं 2019पर्यंत इंडो-एशिया महासागरात जवळपास 60 टक्के युद्धनौका उभं करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. दहशतवादाचा बीमोड करण्याच्या सामग्रीसोबतच या युद्धनौकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची अत्याधुनिक खानपानाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. आमच्या नौदलानं आधीच 60 टक्के पाणडुब्बी समुद्रात तैनात केल्या आहेत. आमचं 2019पर्यंत इंडो-आशिया समुद्रात 60 टक्के युद्धनौका तैनात करण्याचं लक्ष्य आहे, अशी माहिती व्हाइस ऍडमिरल जनरल जोसेफ ऑकॉइन यांनी दिली आहे.
पणजी आणि गोव्याच्या समुद्रात या युद्धनौकांना आश्रय देण्यात येणार असून, अमेरिकेच्या 10 ते 15 अशा जवळपास 60 टक्के युद्धनौका समुद्रात उभ्या राहणार आहेत. या युद्धनौका फक्त आकड्यांमध्ये नसून, त्या उत्तम प्रकारे संरक्षणात उभ्या राहतील.
दहशतवाद्याच्या मुकाबल्यासोबतच आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास या युद्धनौका भारत आणि अमेरिकेच्या मदतीसाठी कार्यतत्पर असतील. समुद्रमार्गे वाहतूक होत असल्यानं मेरिटाइम संरक्षण फारच महत्त्वाचं आहे. जवळपास 90 टक्के वाहतूक ही समुद्रमार्गे होत असते. आम्ही भारत, दक्षिण आणि पश्चिम आशियातल्या देशांच्या मदतीसाठी काम करू, अशीही माहिती व्हाइस ऍडमिरल यांनी दिली आहे.