Sudoku puzzle: सुडोकूचा जन्मदाता हे जग सोडून गेला; माकी काजी यांचे कर्करोगाने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 11:28 AM2021-08-18T11:28:14+5:302021-08-18T11:28:40+5:30
Sudoku Maki Kaji: सुडोकू जगातील एक प्रसिद्ध खेळ आहे. 2004 मध्ये त्याने जपानाहेर पाऊल ठेवले. ब्रिटनच्या द टाईम्सने हे पहिल्यांदा प्रकाशित केले आणि त्याचे चाहते वाढू लागले. जगभरातील 100 देशांत आजही या कोड्याचे अस्तित्व आहे.
जगभरात 20 कोटींहून अधिक लोक दिवाने असलेल्या सुडोकू कोड्याचे (Sudoku puzzle) जन्मदाते माकी काजी (69) (Maki Kaji) यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना पित्ताशयाचा कॅन्सर झाला होता. (Sudoku puzzle: Maki Kaji died in Japan)
माकी काजी हे विद्यापीठातून ड्रॉपआऊट होते. त्यांना सुडोकूचा गॉड फादर म्हचले जायचे. माकी काजी यांची कंपनी निकोलीने मंगळवारी त्यांच्या निधनाची माहिती सार्वजनिक केली. टोक्यो मेट्रो क्षेत्रात मिताका शहरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुडोकू दोन दशकांपूर्वी जपानबाहेर लोकप्रिय झाले होते.
यानंतर जगभरातील वृत्तपत्रांनी या खेळला आपल्या पानांवर जागा दिली. यामुळे प्रत्येकजण या खेळाचा चाहता झाला होता. सुडोकू एवढे प्रचलित झाले की लोक दिवस दिवस ही कोडी सोडविण्यात गुंतलेले असायचे. हे एवढे लोकप्रिय झाले की, 2006 पासून जागतिक चॅम्पियनशिपचे आयोजन केले जाते.
काजी यांनी जुलैपर्यंत कंपनीचे काम पाहिले होते. 2008 मध्ये त्यांनी सांगितलेले की, मला 1984 मध्ये प्रथम आकड्यांच्या खेळात रुची आली. या खेळाला त्यांनी सुडोकू नाव दिले. हे नाव त्यांना फक्त 25 सेकंदांत आठवले. काजी यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1951 मध्ये जपानच्या सापोरोमध्ये झाला होता.
सुडोकू जगातील एक प्रसिद्ध खेळ आहे. 2004 मध्ये त्याने जपानाहेर पाऊल ठेवले. ब्रिटनच्या द टाईम्सने हे पहिल्यांदा प्रकाशित केले आणि त्याचे चाहते वाढू लागले. जगभरातील 100 देशांत आजही या कोड्याचे अस्तित्व आहे.