अमेरिकेत जाताय? नियम होणार सोप्पे, एच१बी व्हिसा नियमावलीत येणार शिथिलता!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 05:40 AM2023-10-22T05:40:11+5:302023-10-22T05:41:05+5:30

शिक्षण, उद्योग वा नोकरीसाठी अमेरिकेतील वास्तव्यासाठी  आवश्यक एच१बी व्हिसाबाबत अनेक नियमावली आहे. 

going to america now rules will be easy | अमेरिकेत जाताय? नियम होणार सोप्पे, एच१बी व्हिसा नियमावलीत येणार शिथिलता!

अमेरिकेत जाताय? नियम होणार सोप्पे, एच१बी व्हिसा नियमावलीत येणार शिथिलता!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो. बायडेन यांच्या प्रशासनाने परदेशी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या एच१बी व्हिसाच्या नियमात बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. नवे नियम २३ ऑक्टोबरला जाहीर केले जाणार आहेत. त्यावर हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. शिक्षण, उद्योग वा नोकरीसाठी अमेरिकेतील वास्तव्यासाठी  आवश्यक एच१बी व्हिसाबाबत अनेक नियमावली आहे. 

माहितीनुसार, एच१बी व्हिसाची ६० हजारांची मर्यादा कायम राहणार असली, तरी नव्या प्रस्तावानुसार, एका व्यक्तीला एकच नामांकन दाखल करावे लागेल. त्यामुळे अधिक लोकांना संधी मिळेल. तसेच शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियम अधिक शिथिल करण्यात येणार असण्याची शक्यता आहे.

Web Title: going to america now rules will be easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.