गोल्ड हाइस्ट; १२१ कोटींच्या सोन्याचा कंटेनरच पळविला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 06:58 AM2023-04-22T06:58:32+5:302023-04-22T06:58:49+5:30
Gold: कॅनडाच्या टोरांटो विमानतळावर १७ एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा एक विशेष कंटेनर आला. त्यात १४.८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १२१ कोटी रुपये किमतीचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या.
टोरांटो : कॅनडाच्या टोरांटो विमानतळावर १७ एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा एक विशेष कंटेनर आला. त्यात १४.८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १२१ कोटी रुपये किमतीचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. परंतु २० एप्रिल रोजी संपूर्ण माल चोरीला गेल्याचे आढळून आले. तीन दिवसांनंतरही चोरटे हाती लागलेले नाहीत.
तपास पूर्ण होईपर्यंत हा माल कोणत्या कंपनीचा होता आणि तो कोणत्या विमान कंपनीकडून आणला गेला आणि त्याचे वजन किती, हे सांगता येणार नसल्याचे पोलिस अधिकारी ड्युस्टन यांनी सांगितले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे. १९५२ मध्ये टोरांटोहून एक विमान कॅनडाच्या मॉन्ट्रियल भागात पोहोचले होते.
चोरीचे गूढ कायम
लँडिंग केल्यानंतर विमानातून आलेल्या १० सोन्याच्या खोक्यांपैकी ४ चोरीला गेल्याचे आढळून आले. तेव्हा चोरीला गेलेल्या सोन्याची किंमत १४ कोटी रुपये होती. विमानातील या चोरीचा तपास पोलिसांना कधीच पूर्ण करता आला नाही. ही चोरी कशी झाली हे अजूनही गूढ आहे.