नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातून सोनं गायब! मंदिर सीआयएच्या ताब्यात, भाविकांना प्रवेश बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 11:18 PM2023-06-25T23:18:08+5:302023-06-25T23:18:40+5:30
नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातील १०० किलो दागिन्यांपैकी १० किलो सोने गायब झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे.
नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातील १०० किलो दागिन्यांपैकी १० किलो सोने गायब झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. सोने गहाळ झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर भ्रष्टाचारविरोधी संस्थेने मंदिर परिसराचा ताबा तपासासाठी घेतला आहे. त्यामुळे रविवारी भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.
पशुपतीनाथ मंदिर हे काठमांडूमधील सर्वात जुने हिंदू मंदिर आहे. १० किलो सोने गहाळ झाल्याच्या अहवालानंतर संसदेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सरकारने अधिकारांच्या गैरवापराच्या तपासाशी संबंधित असलेल्या सीआयएए या आयोगाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. CIAA ही भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणारी नेपाळ सरकारची सर्वोच्च घटनात्मक संस्था आहे.
‘तुम्ही 6 मुस्लिम देशांवर बॉम्बहल्ले केले’, बराक ओबामांवर निर्मला सीतारमण यांची जहरी टीका
पशुपती क्षेत्र विकास प्राधिकरणाने दावा केला की, त्यांनी जलहरी बनवण्यासाठी १०३ किलो सोने खरेदी केले होते, पण दागिन्यांमधून १० किलो सोने गायब होते. पशुपती एरिया डेव्हलपमेंट ट्रस्टचे कार्यकारी संचालक घनश्याम खतिवडा यांनी माध्यमांना सांगितले की, हरवलेल्या सोन्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर भ्रष्टाचारविरोधी संस्थेने पशुपतीनाथांच्या सोन्याने बनवलेल्या जलाहरीचा दर्जा आणि वजन निश्चित करण्यासाठी ताब्यात घेतले आहे.
तपास प्रक्रियेसाठी नेपाळ लष्कराच्या जवानांसह अनेक सुरक्षा कर्मचारी पशुपती मंदिर परिसरात तैनात करण्यात आले आहेत. दुपारी ३.३० वाजल्यापासून मंदिरात भाविकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली असून मध्यरात्रीपर्यंत मंदिर बंद राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.