टँकमधून निघाले १६ करोडोंचं सोनं
By admin | Published: April 11, 2017 05:53 PM2017-04-11T17:53:08+5:302017-04-11T17:53:08+5:30
लंडनच्या एका व्यक्तीला टँकमधून 16 करोड रुपयांचे सोन मिळालं आहे. त्याने एक इराकी टँक खरेदी केला होता. त्यामध्ये त्याला 16 करोड रुपये किंमतीचे सोनं मिळाले
ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 11 - लंडनच्या एका व्यक्तीला टँकमधून 16 करोड रुपयांचे सोन मिळालं आहे. त्याने एक इराकी टँक खरेदी केला होता. त्यामध्ये त्याला 16 करोड रुपये किंमतीचे सोनं मिळाले आहे.
एखाद्या वाहनाच्या किंवा टँकच्या फ्युएल टाकीमधून सोनं निघाल्याची बातमी कधी तुम्ही वाचलीय... पण, अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. निक मिड यानं एक इराकी टँक विकत घेतला होता. या टँकमध्ये त्याला तब्बल 20 लाख पाऊंड म्हणजेच जवळपास १६ करोड रुपयांचे सोनं सापडले. निक यानं हा टँक जवळपास 30 हजार पाऊंड म्हणजेच जवळपास 24 लाख रुपयांना विकत घेतला होता.
प्रामाणिकपणा दाखवत 51 वर्षीय निकने हे सोनं पोलिसांच्या स्वाधीन केले. 1990मध्ये इराकनं कुवैतवर हल्ला केला होता तेव्हा इराकी सैनिकांनी खूप मोठ्या प्रमाणात सोनं लुटलं होतं. त्यावेळी, कदाचित सैनिकांनी टँकच्या फ्युएल टाकीला कापत त्यामध्ये सोनं भरलं असावं... पण, तेव्हा अमेरिकेनं इराकी सेनेवर हल्ला केल्यानं हे सोनं आपल्यासोबत नेण्यासाठी त्यांना अपयश आलं असावं, असं निकनं म्हटले आहे.
Tank collector shocked to find £2million gold bullion hidden in the fuel compartment of his £30000 vehicle - The Sun https://t.co/KwLvhRWGOm
— Gold news report (@Goldnewsreport) April 9, 2017