PM मोदी US दौऱ्यावर असतानाच आली खुशखबर, भारतीयांना होणार मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 01:33 PM2023-06-22T13:33:06+5:302023-06-22T13:33:33+5:30

बायडेन सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत...

Good news came while PM Modi was on US tour, Indians will benefit america plans move on h1b visa | PM मोदी US दौऱ्यावर असतानाच आली खुशखबर, भारतीयांना होणार मोठा फायदा

PM मोदी US दौऱ्यावर असतानाच आली खुशखबर, भारतीयांना होणार मोठा फायदा

googlenewsNext

वॉशिंग्टन -  भारतीयांना अमेरिकेत राहणे आणि काम करणे सोपे व्हावे यासाठी ज्यो बायडेन प्रशासन एका महत्त्वाच्या योजनेवर काम करत आहे. या प्रकरणाशीसंबंधित 3 लोकांच्या मते, बायडेन प्रशासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आठवड्यातील राजकीय दौऱ्याचा उपयोग भारतीयांना देशात (अमेरिकेत) प्रवेश करण्यासाठी व्हिसा नियमांमध्ये सूट देऊन करू शकते. सूत्रांमधील एकाने म्हटल्यानुसार, यासंदर्भात परराष्ट्र विभाग गुरुवारी घोषणा करू शकतो. यानंत काही भारतीय आणि इतरही दुसऱ्या देशांतील कर्मचारी परदेश दौरा केल्याशिवाय अमेरिकेत एच1बी व्हिसा नूतनीकरण करू शकतात. 

हा एक पायलट प्रोजेक्ट असून येणाऱ्या काही वर्षांत याचा विस्तार केला जाऊ शकतो. आतापर्यंत यूएस एच-१ व्हिसाचा सर्वाधिक वापर भारतीयांनी केला आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये जवळपास 442000 एच1-बी व्हिसाचा वापर करण्यात आला. यांपैकी 73% भारतीय नागरिक होते. अमेरिकेतील आणखी एका अधिकाऱ्याने म्हटल्यानुसार, 'आमच्या लोकांची गतिशीलता ही आमच्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे आणि म्हणूनच त्यांना बहुआयामी पद्धतीने सुविधा पुरविणे हे आमचे ध्येय आहे, संबंधित विभाक आधीपासून काही गोष्टींमध्ये बदल करण्यासाठी रचनात्मक पद्धतीने काम करत आहे.’

मात्र यावेळी, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी, कुठल्या प्रकारचे व्हिसा योग्य असतील अथवा पायलट प्रोजेक्टच्या लॉन्च दरम्यान काय होईल, यासंदर्भात कसल्याही प्रकारचे भाष्य करणे टाळले. या पायलट प्रोजेक्टची योजना सर्वप्रथम फेब्रुवारी महिन्यात ब्लूमबर्ग लॉने रिपोर्ट केली होती. हा प्रोजेक्ट लहान पातळीवर लागू करण्यासंदर्भात प्रवक्ते म्हणाले, ‘पुढील एक ते दोन वर्षांत हा प्रोजेक्ट पुढे नेण्याच्या दृष्टीने कमी संख्येने सुरुवात होईल. यातच व्हाइट हाऊसनेही यावर भाष्य करण्यास नकार दिला असून या योजनेत बदलही केला जाऊ शकतो. यामुळे जोवर याची घोषणा होत नाही, तोवर त्यास अंतिम रूप दिले जाऊ शकत नाही, अशे म्हटले आहे.

Web Title: Good news came while PM Modi was on US tour, Indians will benefit america plans move on h1b visa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.