गुडबाय 2017, वेलकम 2018 : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं सर्वात अगोदर जल्लोषात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 05:20 PM2017-12-31T17:20:12+5:302017-12-31T17:21:56+5:30
स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर तुफान आतषबाजीला सुरुवात झाली.
ऑकलंड - नवीन वर्षाचे सर्वात पहिले स्वागत न्यूझीलंडमध्ये मोठ्या उत्साहात झाले आहे. ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोशनाई आणि आतषबाजी करून 2018 चे स्वागत करण्यात आले. 2018 या नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करीत सरत्यावर्षाला निरोप देण्यात आला. फटाके फोडून आणि विद्यूत रोषणाई करीत जगभरात नवीन वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
Fireworks from Oakland, New Zealand!
— Hello Posting (@helloposting) December 31, 2017
2018 has been officially welcomed there! #NewYear#NewZealand#Oakland#HappyNewYearpic.twitter.com/kHf1BmWquV
स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर तुफान आतषबाजीला सुरुवात झाली. सर्वात पहिल्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी न्यूझीलंडमध्ये धाव घेतली आहे. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये देखील नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर नववर्षानिमित्त नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.
Auckland in New Zealand becomes first major city to welcome in 2018 #HappyNewYearpic.twitter.com/rXqgihHqDi
— BBC News (World) (@BBCWorld) December 31, 2017
जगातल्या प्रत्येक देशात सूर्य उगवण्याची वेळ वेगवेगळी आहे. आणि त्यानुसार तिथे तिथे सरत्या वर्षाला अलविदा देऊन नववर्षाचं स्वागत केलं जातं. पृथ्वीच्या प्रदक्षिणासोबत प्रत्येक देशाची वेळ ठरवली जाते. झगमगत्या रोषणाईत, फटाक्यांच्या आतिषबाजीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचं स्वागत केलं.
Wishing Everyone an Abundance
— Dашη Marie (@dawnclark6) December 31, 2017
Of Prosperity,Good Health & Joy ☺
#Happynewyearpic.twitter.com/lW0By673wL