गुगल-फेसबुक यांना बातम्यांसाठी द्यावे लागणार माध्यमांना पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 12:02 AM2020-08-02T00:02:36+5:302020-08-02T00:02:44+5:30
जगात प्रथमच झाला निर्णय : आॅस्ट्रेलिया सरकारचा मसुदा जाहीर
सिडनी : फेसबुक आणि गुगल या कंपन्यांविरुद्ध आॅस्ट्रेलिया सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आॅस्ट्रेलियातील माध्यम क्षेत्रातील कंपन्यांकडून घेतलेल्या बातम्यांच्या आशयासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. पारंपरिक प्रसारमाध्यमांतून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती दोन्ही कंपन्यांनी जाहीर करावी, असे निर्देश आॅस्ट्रेलिया सरकारने दिले आहेत. या नियमांचा भंग केल्यास मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
आॅस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांना उत्पन्नाचा मार्ग खुला करण्याच्या दृष्टिकोनातूनही या निर्णयाकडे बघितले जात आहे. सरकारने यासाठी आचारसंहितेचा मसुदाही प्रसिद्ध केला आहे. बातम्यांबाबत आॅस्ट्रेलियाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता फेसबुक आणि गुगल या कंपन्यांनाही आपले धोरण बदलावे लागणार आहे. आर्थिक बाबतीत नव्याने धोरण आखावे लागणार आहे.
28 आॅगस्टपर्यंत चर्चेनंतर हा मसुदा संसदेत मांडला जाणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री जोश फ्रायडेनबर्ग यांनी दिली.
च्वर्षअखेरीस याचे कायद्यात रूपांतर होईल.
च्कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता डिजिटल प्लॅटफॉर्मवर पारंपरिक प्रसारमाध्यमांतील माहिती वापरली जाते, अशी तक्रार जुनीच आहे.
च्सुरुवातीला हा नियम या दोन कंपन्यांपुरताच मर्यादित असला तरी भविष्यात हा नियम इतर डिजिटल माध्यमांनाही लागू केला जाऊ शकतो.
च्या मुद्याला आता आॅस्ट्रेलियात राजकीय पाठबळ मिळाले आहे. आॅस्ट्रेलियानंतर अन्य देशही याचा वापर करणार का? याकडेही आता लक्ष लागले आहे.