गुगल आणणार टॉरंट वेबसाईट्सवर बंदी

By admin | Published: February 14, 2017 11:34 AM2017-02-14T11:34:46+5:302017-02-14T11:34:46+5:30

गुगलने पायरसीविरोधातील आपला लढा अधिक तीव्र करत टॉरंट वेबसाईटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे

Google launches Torrent Websites | गुगल आणणार टॉरंट वेबसाईट्सवर बंदी

गुगल आणणार टॉरंट वेबसाईट्सवर बंदी

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - गुगलने पायरसीविरोधातील आपला लढा अधिक तीव्र करत टॉरंट वेबसाईटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. टॉरंटफ्रीकने दिलेल्या वृत्तानुसार पायरसीला प्रोत्साहन दिलं जात असल्याने हॉलिवूडमधील प्रतिनिधींकडून गुगलवर टीका होत होती. त्यामुळेच गुगलने हॉलिवूडमध्ये चालणाऱ्या पायरसीवर निशाणा साधत टॉरंट वेबसाईटवर बंदीचा निर्णय घेतला आहे. टॉरंट बेवबसाईट्सचा सामना करण्यासाठी फक्त गुगलनेच पुढाकार घेतला नसून गूगलसोबतच बिंग, याहू, यासारख्या सर्च इंजिनकडूनही टॉरंट वेबसाईटवर बंदी घालण्यात येणार आहे.
 
ब्रिटनमध्ये नुकतीच यासंबंधी बैठक पार पडली. बैठकीत गुगल, याहू, बिंग आणि हॉलिवूडचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सध्या फक्त ब्रिटनमध्येच गुगल कारवाई करत टॉरंट वेबसाईट्स आणि सर्व्हरवर बंदी घालणार आहे. त्यानंतर हळू हळू जगभरात ही कारवाई करण्यास सुरुवात होईल. बैठकीतील सर्व मुद्दे जाहीर करण्यात आले नसले तरी 1 जून 2017 पासून या वेबसाईट्स वापरता येणार नाहीत. त्यामुळे जगभरातील टॉरंट वापरकर्त्यांना याचा फटका बसणार आहे. 
 
गेल्यावर्षी कॉपीराईट अॅक्टचं उल्लंघन केल्यानंतर गुगल वादात अडकलं होतं. मागच्याच वर्षी भारतानेही किक्कॅस टॉरंट आणि सर्च इंजिन टॉरंट्सवर बंदी घातली होती. भारतात टॉरंट वेबसाईट्स पाहिणे आणि डाऊनलोड करणे गुन्हा असून यासाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
 

Web Title: Google launches Torrent Websites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.