'गुगल'नं अफगाण सरकारचे ई-मेल अकाऊंट्स केले बंद; माजी अधिकाऱ्यांचा डाटा चोरी करु शकतं तालिबान!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 01:22 PM2021-09-04T13:22:02+5:302021-09-04T13:23:28+5:30

'गुगल'नं (Google) अफगाण सरकारशी निगडीत अनेक ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत. एकूण किती अकाऊंट्स बंद केले गेलेत याची माहिती गुगलकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

Google locks Afghanistan govt accounts as Taliban seek access to emails of Former Employee | 'गुगल'नं अफगाण सरकारचे ई-मेल अकाऊंट्स केले बंद; माजी अधिकाऱ्यांचा डाटा चोरी करु शकतं तालिबान!

'गुगल'नं अफगाण सरकारचे ई-मेल अकाऊंट्स केले बंद; माजी अधिकाऱ्यांचा डाटा चोरी करु शकतं तालिबान!

Next

'गुगल'नं (Google) अफगाण सरकारशी निगडीत अनेक ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत. एकूण किती अकाऊंट्स बंद केले गेलेत याची माहिती गुगलकडून अद्याप देण्यात आलेली नाही. पण अफगाणिस्तानाततालिबान्यांकडून अफगाण सरकारच्या माजी अधिकाऱ्यांच्या ई-मेल अकाऊंट्सचा गैरवापर केला जाऊ नये याची खबरदारी म्हणून गुगलनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. 

धक्कादायक! तालिबान्यांनी गोळीबारानं केलेल्या सेलिब्रेशनमध्ये लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू 

तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा मिळवण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक अफगाणी अधिकारी देश सोडून निघून गेले. यात अफगाणचे राष्ट्रपती अशरफ घनी यांचाही समावेश आहे. राष्ट्रपती घनी आणि अधिकारी देश सोडून निघून गेले असले तरी त्यांचे ई-मेल अकाऊंट्स तालिबान्यांच्या हाती लागू नयेत यासाठी गुगलनं सरकारशी निगडीत व्यक्तींचे सर्व ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत. 

भारतातील  मुस्लिमांसंदर्भात तालिबानचं मोठं वक्तव्य, अफगाणिस्तानातील अल्पसंख्यकांची करून दिली आठवण

अफगाणिस्तानातील ज्या नागरिकांनी अमेरिकेला आणि अफगाण सरकारला मदत केली अशांचा शोध घेऊन तालिबानकडून त्यांना मारण्यात येत असल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेला मदत करणाऱ्या अफगाणी नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून सर्व अफगाण अधिकाऱ्यांचे ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत. 

'गुगल'नं काय म्हटलं?
सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही काही अकाऊंट्स तात्पुरत्या स्वरुपात बंद करत आहोत, असं गुगलनं स्पष्ट केलं आहे. पण हे अकाऊंट्स कायमस्वरुपी बंद करण्याबाबतची कोणतीही स्पष्टता गुगलकडून देण्यात आलेली नाही. "तज्ज्ञांच्या माध्यमातून आम्ही अफगाणिस्तानातील परिस्थितीची माहिती घेत आहोत. आणि ई-मेल अकाऊंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी काही अकाऊंट्स तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आलेली आहेत. अफगाणिस्तान सरकारच्या एका अधिकाऱ्यानं तालिबानकडून ई-मेल अकाऊंट्सचा गैरवापर केला जाऊ शकतो अशी तक्रार दिली आहे. त्यानुसारच काही अकाऊंट्स बंद करण्यात आली आहेत", असं गुगलच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे. 

Web Title: Google locks Afghanistan govt accounts as Taliban seek access to emails of Former Employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.