गुगलच्या स्वयंचलित कारने बसला दिली धडक
By admin | Published: March 1, 2016 11:54 AM2016-03-01T11:54:34+5:302016-03-01T11:56:28+5:30
गूगलच्या स्वयंचलित काने एका प्रवासी बसला धडक दिल्याने अपघात झाला.
Next
>ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. १ - गूगलने मोठा गाजावाजा करत 'स्वयंचलित कार' बाजारात उतरवण्यास निर्णय घेतला आहे. मात्र चाचणी दरम्यान या कारने एका प्रवासी बसला धडक दिल्याने अपघात झाल्याचे वृत्त आहे.
गूगलचे मुख्यालय असलेल्या कॅलिफोर्नियातील माऊंटन व्ह्यू येथे दोन आठवड्यांपूर्वी, १४ फेब्रुवारी रोजी 'लेक्सस एसयूव्ही' या स्वयंचलित कारची चाचणी घेण्यात येत होती. मात्र या कारने बाजून जाणा-या एका प्रवासी बसला धडक दिल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी यामुळे ही स्वयंचलित कार भविष्यात कितपत यशस्वी ठरेल याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या अपघाताप्रकरणी सविस्तर माहिती देणारा अहवाल गूगलने कॅलिफोर्नियातील वाहहन विभागाला सादर केला असून तो सोमवारी ऑनलाइन जारी करण्यात आला होता.