गुगलची स्टिअरिंग नसलेली नवी कार

By admin | Published: May 29, 2014 04:20 AM2014-05-29T04:20:03+5:302014-05-29T04:20:03+5:30

गुगल स्टिअरिंगविरहित कार तयार करणार असून, ही कार स्वत:च चालू होणार असल्याने ती चालविण्यासाठी स्टिअरिंगची गरज राहणार नाही

Google's new car without steering | गुगलची स्टिअरिंग नसलेली नवी कार

गुगलची स्टिअरिंग नसलेली नवी कार

Next

लॉस एंजल्स : गुगल स्टिअरिंगविरहित कार तयार करणार असून, ही कार स्वत:च चालू होणार असल्याने ती चालविण्यासाठी स्टिअरिंगची गरज राहणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे. ही दोन आसनी कार सरसकट विकली जाणार नाही; पण पुढच्या वर्षापर्यंत ती सादर होईल, असे कंपनीने जाहीर केले आहे. या १०० कार पुढच्या वर्षी रस्त्यावर असतील. त्यांचा वेग फारसा असणार नाही, ताशी २५ मैल इतक्या वेगाने त्या जातील. अशी कार तयार करणे गुगलला सहजशक्य आहे, कारण या कंपनीने कॅलिफोर्नियात हजारो मैल लेक्सस सुव व टोयोटा प्रियुसस यासारख्या गाड्या संवेदक व संगणक लावून चालवल्या आहेत. स्टिअरिंग व्हील नाही, ब्रेक नाहीत आणि पायडलही नाहीत, त्याऐवजी कार चालू व बंद करण्यासाठी बटणे असतील. आपल्या खुर्चीची लिफ्ट आपणच पकडावी व जावे तसे हे होईल, असे गुगलचे सहसंस्थापक सर्जी ब्रिन यांनी सांगितले. या कारचा आकार फुग्यासारखा असेल, असे त्यांनी कॅलिफोर्निया येथील तंत्रज्ञान अधिवेशनात सांगितले. ही विजेवर चालणारी कार असून, लोकांना गावातील गर्दीतून आपल्या निवासस्थानी नेण्यासाठी तिचा उपयोग होईल. गुगल वाहने तयार करण्याच्या उद्योगात पडणार नाही. इतर कंपन्यांच्या भागीदारीत वेगळी वाहने तयार केली जातील. सर्वात मोठा अडसर कायदा हा असेल. (वृत्तसंस्था) प्

Web Title: Google's new car without steering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.