गुगलनं 'पिक्सल' स्मार्टफोन केला लाँच
By admin | Published: October 5, 2016 12:16 AM2016-10-05T00:16:44+5:302016-10-05T00:16:44+5:30
गुगलच्या ज्या फोनची चर्चा होती तो गुगलचा पिक्सल स्मार्टफोन अखेर लाँच झाला
ऑनलाइन लोकमत
सॅन फ्रान्सिस्को, दि. 4 - गेल्या काही दिवसांपासून गुगलच्या ज्या फोनची चर्चा होती तो गुगलचा पिक्सल स्मार्टफोन अखेर लाँच झाला आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा इतर मोबाईलच्या कॅमे-याच्या तुलनेत अॅडवान्स असल्याचा दावा गुगल कंपनीनं केला आहे. गुगलनं स्मार्टफोनच्या माध्यमातून अॅपलच्या आयफोनला टक्कर देण्यासाठी हा फोन काढल्याची बाजारात चर्चा आहे.
13 ऑक्टोबरपासून हा फोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, या स्मार्टफोनची 57 हजार रुपये इतकी किंमत असणार आहे. गुगल कंपनीच्या ब्रायन राकोवस्की यांनी पिक्सल आणि पिक्सल एक्स एल या दोन स्मार्टफोन्सची घोषणा केली.
भारतात फ्लिपकार्ट, रियालन्स डिजिटल आणि क्रोमा या ई-कॉमर्स साइटवर हे फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, ब्लू. ब्लॅक आणि सिल्व्हर अशा तीन कलर्समध्ये हे फोन उपलब्ध असणार आहेत.