गुगलच्या सेल्फ ड्रायव्हिंग कारला अपघात, प्रवासी जखमी
By admin | Published: July 18, 2015 03:27 AM2015-07-18T03:27:08+5:302015-07-18T10:21:04+5:30
गुगलच्या बहुचर्चित सेल्फ ड्रायव्हिंग कारला चाचणीदरम्यान अपघात झाला असून, कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. गेल्या सहा वर्षांत या कारची १९ लाख मैल अंतरावर
कॅलिफोर्निया : गुगलच्या बहुचर्चित सेल्फ ड्रायव्हिंग कारला चाचणीदरम्यान अपघात झाला असून, कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. गेल्या सहा वर्षांत या कारची १९ लाख मैल अंतरावर चाचणी घेण्यात आली असून, कारला १४ अपघात झाले, पण कारमधील प्रवासी जखमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कॅलिफोर्नियातील रस्त्यावर गुगल कंपनीतर्फे २५ सेल्फ ड्रायव्हिंग (चालकाविना चालणारी) कार उतरवण्यात आल्या असून त्यांची चाचणी घेतली जात आहे. कॅलिफोर्नियातील माऊंट व्ह्यू येथे गुगलच्या लेक्सस व्ह्यू या गाडीला अपघात झाला आहे.
ही गाडी चौकात उभी असता, दुसऱ्या कारने धडक दिली. ही घटना १ जुलै रोजी घडली, पण त्याची माहिती आता मिळाली आहे.
अपघातात दुसऱ्या गाडीचे काहीही नुकसान झाले नाही, पण गुगल कारमधील लोक किरकोळ जखमी झाले.
दरम्यान, गुगलच्या दोन आसनी सेल्फ ड्रायव्हिंग कारला रस्त्यावर उतरवण्याची परवानगी अमेरिकेत देण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)