एका संघर्षयोद्ध्याला गुगलची श्रद्धांजली, डुडल अन् व्हीडिओद्वारे सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 09:02 AM2019-03-07T09:02:30+5:302019-03-07T09:05:20+5:30
ओगला लेडीशेंजकिया असे या गणिततज्ञ महिलेचं नाव असून डिफरेन्शियल इक्वेशन्स आणि फ्लूड डायनॅमिक्सवर त्यांनी केलेल्या संधोधनाबद्दल गुगलकडून त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
मुंबई - गुगलचे डुडल आता नवीन बाब राहिली नाही, पण या डुडलवरुन नेहमीच नवीनवीन चेहऱ्यांची ओळख जगाला करून दिली जाते. गुगलवरुन त्या व्यक्तींची आणि त्यांच्या कार्याची महती लक्षात घेता, गुगलकडून ही आदरांजली वाहण्यात येते. आजही, गुगलने सेवियत युनियन (आता रुस) मधील एका प्रख्यात गणिततज्ञ महिलेला त्यांच्या 97 व्या जन्मदिनी व्हीडिओ अन् डुडलमधून श्रद्धांजली वाहिली आहे.
ओगला लेडीशेंजकिया असे या गणिततज्ञ महिलेचं नाव असून डिफरेन्शियल इक्वेशन्स आणि फ्लूड डायनॅमिक्सवर त्यांनी केलेल्या संधोधनाबद्दल गुगलकडून त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. गुगलवरील या व्हीडिओत त्यांचे जीवन आणि त्यांच्या कार्याची झलक दाखविण्यात येत आहे. सेवियत युनियनधील कोलोग्रीव या शहरात लेडीशेंजकिया यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडिलही गणिताचे शिक्षक होते. त्यामुळे गणितमध्ये लेडीशेंजकिया यांना लहानपणापासूनच आवड निर्माण झाली. त्यांचे आयुष्य म्हणजे एक संघर्षप्रवासच आहे. अगदी लहानपणीच त्यांचे लग्न झाले होते, तर सेवियनत सरकारने त्यांच्या वडिलांना लोकांचे दुश्मन ठरवून टाकले होते. तेथील मंत्रालयाने जेव्हा शेंजकिया यांच्या वडिलांना तुरुंगात टाकले, त्यावेळी शेंजकिया या केवळ 15 वर्षांच्या होत्या. विषेश म्हणजे, त्यानंतर सेवियत सरकारकडून शेंजकिया यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती. तर चांगले गुण मिळवूनही शेंजकिया यांना रुसमधील सर्वात मोठी असलेल्या लेनिनग्राद युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे आयुष्यात त्यांना अनेक खाचखळगे खावे लागले आहेत. मात्र, संघर्षाचा शेवट चांगला असून इतिहास नेहमीच त्याची दखल घेत असतो, हेही शेंजकिया यांच्या बाबतीत खरं ठरलं आहे. त्यामुळेच, आज गुगलकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. दरम्यान, 12 जानेवारी 2004 मध्ये रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.