EVM हॅकिंगची कल्पना असल्याने गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकेतील हॅकरचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 07:24 PM2019-01-21T19:24:44+5:302019-01-21T21:10:12+5:30
भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM हॅक होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून सातत्याने होत असतानाच या प्रकरणी एका अमेरिकन सायबर एक्सपर्ट्सने खळबळजनक दावा केला आहे.
लंडन - भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM हॅक होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून सातत्याने होत असतानाच या प्रकरणी एका अमेरिकन सायबर एक्सपर्ट्सने खळबळजनक दावा केला आहे. 2014 साली भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये EVM हॅकिंग झाले होते. तसेच या EVM हॅकिंगबाबत कल्पना असल्यानेच भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, असा आरोप या सायबर एक्सपर्ट्सने केला आहे.
सय्यद सुजा असे या सायबर एक्सपर्ट्सचे नाव असून त्याने लंडनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे दावे केले. लंडनमध्ये आयोजित एका हॅकेथॉनमध्ये त्याने EVM हॅक होऊ शकतात, असा दावा केला आहे. विशेष बाब म्हणजे काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल हे या हॅकेथॉनला सुरुवातीपासून उपस्थित होते.
भाजपाच नव्हे तर आम आदमी पक्षानेही EVM हॅक करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले असून, 2015 साली दिल्लीत झालेल्या निवडणुकीत आपने त्याच्या जोरावरच विजय मिळवला, असा गौप्यस्फोट या हॅकरने केला आहे. इव्हीएम हॅकिंग संदर्भात भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना कल्पना होती. त्यामुळेच त्यांची हत्या झाली, असा आरोपही त्याने यावेळी केला. समाजवादी पक्ष आणि बसपानेही इव्हीएम हॅकिंग करण्यासाठी संपर्क केल्याचा आरोप या हॅकरने केला. काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांना EVM हॅकिंगबाबत माहित असल्याचाही आरोप त्याने केला.
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने EVM हॅकरचे हे दावे फेटाळून लावले आहेत. लंडनमधील एका कार्यक्रमात भारतातील EVM हॅक होऊ शकतात, असा दावा केला जात आहे. मात्र निवडणूक आयोग या प्रकरणात पडू इच्छित नाही. भारतातील EVM सुरक्षित आहेत, त्यांमध्ये छेडछाड होऊ शकत नाही, या दाव्यावर आम्ही कायम आहोत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
EC: These EVMs are manufactured in Bharat Electronics Ltd. & Electronics Corporation of India Ltd. under very strict supervisory&security conditions.There are rigorous Standard Operating Procedures observed under supervision of a Committee of technical experts constituted in 2010 https://t.co/NAgRYcAqIB
— ANI (@ANI) January 21, 2019
हे तर काँग्रेसचे कारस्थान, भाजपाचा पलटवार
भाजपाने नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी यामागे कारस्थान असल्याचा प्रत्यारोप केला आहे. ''काँग्रेसकडे बरेच फ्रीलान्स नेते आहेत. ते मोदींना हटवण्यासाठी मदत मागण्यासाठी पाकिस्तानमध्येसुद्धा पोहोचतात. येत्या निवडणुकीतील पराभवाची कुणकुण लागल्याने काँग्रेसवाले हॅकिंग हॉरर शो आयोजित करत आहेत. कपिल सिब्बल यांचे तिथे उपस्थित राहणे हा केवळ योगायोग नाही. त्यांना काँग्रेस, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी तिथे पाठवले होते, असा आरोपही मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला.
MA Naqvi on event claiming to demonstrate EVMs in India can be tampered with, held in London: Congress has a lot of freelancers, who sometimes reach even Pak to take help for removing Modi Ji.They are making a hacking horror show of their possible defeat in the upcoming elections pic.twitter.com/MEEugGryXA
— ANI (@ANI) January 21, 2019