भारतीय ख्रिश्चन धर्मगुरू टॉम उझहन्नलिल यांच्या सुटकेसाठी भारत सरकारचे प्रयत्न
By admin | Published: March 26, 2016 10:11 AM2016-03-26T10:11:20+5:302016-03-26T10:12:29+5:30
येमेनमध्ये राहणा-या ५६ वर्षीय टॉम उझहन्नलिल यांचे दहशतवाद्यांकडून अपहरण झाल्याच्या माहितीला केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दुजोरा दिला आहे. ट्विटवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - येमेनमध्ये राहणा-या ५६ वर्षीय टॉम उझहन्नलिल यांचे दहशतवाद्यांकडून अपहरण झाल्याच्या माहितीला केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दुजोरा दिला आहे. ट्विटवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. केरळमधील भारतीय नागरिक टॉम उझहन्नलिल यांचे येमेनमध्ये दहशतवादी संघटनेने अपहरण केलं आहे, भारत सरकार त्यांच्या सुटकेसाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याची माहितीदेखील सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
भारतीय वंशाचे ख्रिश्चन धर्मगुरू (पाद्री) टॉम उझहन्नलिल यांची कुख्यात दहशतवादी संघटना इसिस ( इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया) 'गुड फ्रायडे'च्याच दिवशी हत्या करणार असल्याची माहिती मिळाली होती. येमेनमध्ये राहणा-या ५६ वर्षीय टॉम उझहन्नलिल यांचे ४ मार्च रोजी अपहरण करण्यात आले आहे. आणि टॉम याच्या अपहरणांतर अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी सोशल मीडियावर त्यांची सुटका करण्याचे आवाहन केले आहे.
मार्च महिन्यात इसिसने येमेनमधील वृद्धाश्रमावर हल्ला करून ४ नन्ससह १६ जणांची हत्या केली होती व त्याचवेळी टॉम यू यांचे अपहरण केले होते. त्यानंतर टॉम यू यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नव्हती. मात्र त्यानंतर काही दिवसांनी काही नन्सनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर एक मेसेज अपलोड केला होता, ज्यात टॉम यांना टॉर्चर करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच 'गुड फ्रायडे'ला त्यांची हत्या करण्यात येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.
Fr Tom Uzhunnallil - an Indian national from Kerala was abducted by a terror group in Yemen. We r making all efforts to secure his release.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) March 26, 2016