इराकमधील भारतीयांच्या सुरक्षेवर सरकारचे लक्ष
By admin | Published: June 18, 2014 05:27 AM2014-06-18T05:27:17+5:302014-06-18T05:27:17+5:30
इराकमध्ये बंडखोर आणि सैन्यदलादरम्यान सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान येथे अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसंदर्भातील चिंता वाढल्या
नवी दिल्ली : इराकमध्ये बंडखोर आणि सैन्यदलादरम्यान सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान येथे अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसंदर्भातील चिंता वाढल्या असतानाच, केंद्र सरकार संपूर्ण स्थितीवर कायम लक्ष ठेवून आहे़ इराकमधील हिंसाप्रभावित मोसूल व तिकरितमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी इराकी अधिकाऱ्यांच्या मदतीचे यथाशक्ती प्रयत्न सुरूआहेत़
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने मंगळवारी ही माहिती दिली़ सरकार इराकमधील स्थितीवर कायम लक्ष ठेवून असून हिंसाग्रस्त तिकरित आणि मोसूल शहरांत अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी यथाशक्ती प्रयत्न सुरू आहेत़ खुद्द परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज स्थितीवर नजर ठेवून आहेत, असे या प्रवक्त्याने स्पष्ट केले़ भारतीय दूतावासाने संयुक्त राष्ट्रांच्या संस्था आणि इराक सरकारशी सातत्याने संपर्क चालविला आहे. अडकून पडलेल्या भारतीयांशीही संपर्क सुरू आहे़
(लोकमत न्यूज नेटवर्क)