पतीचे जननेंद्रिय प्रमाणापेक्षा मोठे, पत्नीची घटस्फोटाची मागणी

By Admin | Published: May 4, 2016 03:44 PM2016-05-04T15:44:34+5:302016-05-04T15:44:34+5:30

सध्या घटस्फोटांचे प्रमाण वाढत असताना त्यामागील कारणांमध्ये देखील रोज नवनवीन भर पडत आहे. अशातच पतीचे गुप्तांग मोठे असल्याने नववधूने घटस्फोटाचा अर्ज दिल्याची घटना नायजेरियात घडली आहे.

Greater than husband's penis size, wife divorce divorce | पतीचे जननेंद्रिय प्रमाणापेक्षा मोठे, पत्नीची घटस्फोटाची मागणी

पतीचे जननेंद्रिय प्रमाणापेक्षा मोठे, पत्नीची घटस्फोटाची मागणी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नायजेरिया, दि. ४ : सध्या घटस्फोटांचे प्रमाण वाढत असताना त्यामागील कारणांमध्ये देखील रोज नवनवीन भर पडत आहे. अशातच पतीचे गुप्तांग मोठे असल्याने नववधूने घटस्फोटाचा अर्ज दिल्याची घटना नायजेरियात घडली आहे.
तीन मुलांची आई असलेल्या आईशा दान्नुपावा या नायजेरियातील झाम्फारा भागात स्थायिक असून पहिल्या पती बरोबर फारकत घेऊन अली मैझीनारी यांच्याशी आठवडाभरापूर्वीच दुसरा विवाह केला होता.

गृहिणी असलेल्या आईशा यांनी पतीचे जननेंद्रिय आकाराने मोठे असल्याने घटस्फोटाची मागणी केली असून घटस्फोटाचे तेच एकमेव कारण असल्याचे सांगितले आहे. नायजेरियातील झाम्फारा भागात नववधूला पतीच्या घरी जाण्यापूर्वी तिचे आई-वडील काही कालावधीसाठी आपल्या घरी निमंत्रित करतात अशी तिथे परंपरा आहे. या कालावधीतचं आपल्या पतीबरोबर पहिल्यांदा प्रणय करताना आईशा यांना त्रास झाला असल्याचे त्रीबून या नायजेरियातील वृत्तपत्राने म्हटले आहे. पतीबरोबर प्रणय करताना अतीव वेदना होतात असे आईशा यांनी घटस्फोटाचा अर्ज करताना कोर्टाला सांगितले आहे.


अनेक पयत्न करून देखील वेदना कमी होत नसल्याने आपल्या आईच्या सांगण्यावरून डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधं देखील घेतली परंतु त्रास काही केल्या कमी होत नसल्याने लग्नातून वेगळे होण्याचा मार्ग निवडला असल्याचे आईशा यांनी सांगितले.
आईशा यांचे पती अली यांनी आपले जननेंद्रिय मोठे असल्याचे मान्य केले असून सामंजस्याने ही समस्या सोडवण्याची तयारी दाखवली आहे. मात्र या सर्व प्रकरणात आपण हुंड्यापोटी दिलेली रक्कम ही आईशा आणि तिच्या आई वडिलांनी परत करावी अशी मागणी देखील केली आहे

 

Web Title: Greater than husband's penis size, wife divorce divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.