ग्रीक अर्थमंत्र्यांचा राजीनामा
By admin | Published: July 6, 2015 11:45 PM2015-07-06T23:45:27+5:302015-07-06T23:45:27+5:30
ग्रीसचे अर्थमंत्री यानिस व्हरोफाकीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
अथेन्स : ग्रीसचे अर्थमंत्री यानिस व्हरोफाकीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, ग्रीक नागरिकांनी ऐतिहासिक बेलआऊट सार्वमतात पंतप्रधान अलेक्सिस सिपारीस यांना विजयी केल्यानंतर पडलेला हा पहिला बळी मानण्यात येत आहे.
ग्रीक नागरिकांनी बेलआऊट प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे युरोपियन नेतेही गोंधळून गेले आहेत. कारण सार्वमत नकारार्थी झाल्यास युरोझोनमधून बाहेर पडावे लागेल असा इशारा युरोपीयन देशांनी दिला होता. सार्वमताचा निकाल जाहीर झाल्यानंतर युरोग्रूपमधील सदस्यांनी अर्थमंत्री यानिस यांच्या अनुपस्थितीसाठी पंतप्रधान सिपारीस यांना काही सवलती देऊ केल्या होत्या. ही बाब कानावर आल्यानंतर अर्थमंत्री यानिस यांनी राजीनामा दिला आहे. (वृत्तसंस्था)
वाटाघाटीस विरोध
४गेल्या काही महिन्यात ग्रीस अडचणीत आल्यानंतर देणगीदार देशांशी वाटाघाटी करण्यास यानिस यांनी नेहमीच विरोध केला होता. यासाठीच मी अर्थमंत्रालयाचा राजीनामा देत आहे असे यानिस यांनी म्हटले आहे.
४यानिस यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर युरो चलनाचे मूल्य वाढले, ही बाब मदतकर्त्या देशांसाठी उत्साहजनक होती.