ग्राऊंड झीरोवर रेल्वे स्टेशनची भव्य वास्तू

By admin | Published: March 4, 2016 02:38 AM2016-03-04T02:38:16+5:302016-03-04T02:38:16+5:30

१४ वर्षांपूर्वी ९/११ च्या हल्ल्यात न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर नष्ट झाले होते. या जागेवर आता भव्य रेल्वे स्टेशन उभारण्यात आले आहे.

Ground Zirovar Railway Station Vastu | ग्राऊंड झीरोवर रेल्वे स्टेशनची भव्य वास्तू

ग्राऊंड झीरोवर रेल्वे स्टेशनची भव्य वास्तू

Next

न्यूयॉर्क : १४ वर्षांपूर्वी ९/११ च्या हल्ल्यात न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर नष्ट झाले होते. या जागेवर आता भव्य रेल्वे स्टेशन उभारण्यात आले आहे. या रेल्वे स्टेशनची दुसरी बाजू म्हणजे ते जगातील सर्वात महागडे रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन आता जनतेसाठी खुले होत आहे. अर्थात उद्घाटनासारखे कोणतेही सोपस्कार होणार नाहीत.
न्यूजर्सी आणि न्यूयॉर्क सब वे लाईनला जोडणारे हे रेल्वे केंद्र आहे. या रेल्वे स्टेशनमध्ये दुकाने आणि रेस्टॉरंटही आहे.
या इमारतीला स्पॅनिश- स्वीस वास्तुकार सेंटियागो कालात्रावाने डिझाईन केले आहे. अंडाकार इमारतीसाठी स्टीलचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला आहे. काचेच्या फ्रेम लक्ष वेधून घेतात. (वृत्तसंस्था)
हे स्टेशन उभारण्यासाठी १२ वर्षांचा कालावधी लागला. या रेल्वेस्थानकासाठी ३५० कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च झाली आहे. पक्ष्याच्या पंखाचा आभास निर्माण करणारी ही कलाकृती डोळे दिपवणारी आहे.

Web Title: Ground Zirovar Railway Station Vastu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.