जीएसटी विधेयक लवकरच मंजूर होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By admin | Published: April 3, 2016 06:11 PM2016-04-03T18:11:06+5:302016-04-03T18:56:53+5:30

नरेंद्र मोदींनी जागतिक गुंतवणूकदारांना भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं

GST Bill will be approved soon - Prime Minister Narendra Modi | जीएसटी विधेयक लवकरच मंजूर होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

जीएसटी विधेयक लवकरच मंजूर होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next

सौदी अरेबिया, दि. 3- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक गुंतवणूकदारांना भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. इतिहासात फक्त कर निर्धारण करण्यात आलं.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियातल्या व्यावसायिकांना भारतातल्या रेल्वे, संरक्षण, ऊर्जा आदी क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. जीएसटी मंजूर झाल्यावर कर निर्धारण सोपं होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. भारत सरकारनं अनेक क्षेत्र परदेशी गुंतवणुकीसाठी खुली केली असल्याचं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिपादन केलं आहे.

व्यवसाय अनुकूलतेमध्ये वर्ल्ड बँकेने भारताच्या क्रमवारीत १२ स्थानांची सुधारणा केली आहे.  पुढच्या वेळी व्यवसायात भारताचा क्रमांक आणखी सुधारेल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. कारण आपण भरपूर सा-या प्रशासकीय सुधारणाही करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं आहे.

जीएसटीबाबत चिंता करण्याचं कारण नसल्याचंही आश्वासन मोदींनी जागतिक गुंतवणूकदारांना दिलं आहे. जीएसटी लवकरच मंजूर होईल, अस मोदी म्हणाले मात्र त्यांनी त्याचा कालावधी दिला नाही. कर निर्धारणात शक्य त्या सुधारणा करणार असल्याचंही मोदींनी यावेळी आश्वासन दिलं आहे. 

Web Title: GST Bill will be approved soon - Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.