फरार आरोपी मल्ल्या लंडनमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचा अतिथी
By admin | Published: June 18, 2016 05:10 PM2016-06-18T17:10:53+5:302016-06-18T17:12:27+5:30
गुन्हेगार म्हणून घोषित केलेला विजय मल्ल्या लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये एका पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १८ - आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई न्यायालयाने गुन्हेगार म्हणून घोषित केलेला विजय मल्ल्या लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये एका पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भारत सरकारचा उच्चायुक्तही या कार्यक्रमाला उपस्थित होता.
या आठवडयात हा कार्यक्रम झाला. सुहेल सेठ लिखित 'मंत्रास फॉर सक्सेस इंडियाज ग्रेटेस्ट सीईओ टेल्स यू हाव टू विन' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला भारतीय उच्चायुक्त नवतेज सरनाही विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मल्ल्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते असा दावा सुहेल सेठ यांनी केला आहे.
ज्यांना उपस्थित रहायचे आहे त्या सर्वांसाठी हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता असे सेठ यांनी सांगितले. मल्ल्या प्रेक्षकांमध्ये बसला होता. मल्ल्याला बघितल्यानंतर उच्चायुक्त नवतेज मध्यावरुनच निघून गेले असे सेठ यांनी सांगितले. १०० फूट जर्नी क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासंबंधी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय पत्रक प्रसिध्द करु शकते.