५८ कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध, ७१ कोटींची लाच अन्...; चीनमधील बड्या महिला अधिकाऱ्याला १३ वर्षांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 03:54 PM2024-09-21T15:54:45+5:302024-09-21T15:56:37+5:30

कार्यालयातील ५८ पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या चीनमधील राज्यपाल महिलेला कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Guizhou Governor Zhong Yang known as the Beautiful Governor in China has been sentenced to 13 years in prison | ५८ कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध, ७१ कोटींची लाच अन्...; चीनमधील बड्या महिला अधिकाऱ्याला १३ वर्षांचा तुरुंगवास

५८ कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध, ७१ कोटींची लाच अन्...; चीनमधील बड्या महिला अधिकाऱ्याला १३ वर्षांचा तुरुंगवास

China Beautiful Governor Zhong Yang : नैऋत्य चीनमधील 'ब्युटीफूल गव्हर्नर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुइझोउ प्रांताचे गव्हर्नर झोंग यांग यांना १३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. झोंग यांग यांच्यावर ५८ कनिष्ठांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा, भ्रष्टाचारात गुंतल्याचा आणि प्रचंड लाच घेतल्याचा आरोप होता. आता या प्रकरणात त्यांना तब्बल वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय सुमारे एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या महिला अधिकाऱ्यांशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांवर एक माहितीपटही प्रदर्शित करण्यात आला आहे.

चीनच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, दोषी आढळलेल्या ५२ वर्षीय झोंग यांग यांनी क्यानान, गुइझोऊ येथे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे राज्यपाल आणि उपसचिव म्हणून काम केले आहे. झोंग यांग वयाच्या २२ व्या वर्षापासून पक्षाशी संबंधित होत्या. एप्रिल २०२३ मध्ये त्यांना विविध आरोपांप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना पक्षातील पदावरून दूर करून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

जानेवारीमध्ये, गुइझोऊ रेडिओ आणि टेलिव्हिजनने या प्रकरणावर एक डॉक्युमेंटरी बनवला होती. झोंग यांग यांच्याशी संबंधित अनेक वाद त्यातून समोर आले. झोंग यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून लाच घेतल्याचे अहवालात समोर आले आहे. सरकारी गुंतवणुकीच्या बहाण्याने त्यांनी काही निवडक कंपन्यांनाच कामाची मोठी कंत्राटे मिळवून दिली. तसेच जवळच्या व्यावसायिकासाठी हायटेक औद्योगिक वसाहत विकसित करण्यास मान्यता दिली.

डॉक्युमेंटरीमधील एका व्यवसायाच्या मालकाने दावा केला की झोंग ज्या कंपन्यांशी त्यांचे वैयक्तिक संबंध नाहीत त्याकडे लक्ष देत नाही. डॉक्युमेंटरीमध्ये दाखवले की २०२३ मध्ये, गुइझो प्रांतीय शिस्त तपासणी आणि पर्यवेक्षण समितीने जाहीर केले की झोंग या गंभीर शिस्तभंग आणि कायदेशीर उल्लंघनाचा संशयित आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार झोंग यांनी ६० मिलियन युआन (सुमारे ७० कोटी रुपये) लाच म्हणून घेतले आहेत.

झोंग यांनी ५८ पुरुष कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध ठेवल्याचे प्रकरणही समोर आले आहे. त्यांच्यापैकी काहींनी फायद्यासाठी त्ंयाच्याशी संबंध ठेवले, तर काहींनी झोंग यांच्या भीतीपोटी असे केल्याचे तपासात उघड झाले आहे. झोंग या ओव्हरटाईम काम आणि बिझनेस टूरवर जाण्याच्या बहाण्याने या लोकांसोबत वेळ घालवत असे. या संपूर्ण प्रकरणावर झोंग यांचे स्पष्टीकरणही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आले आहे. मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होतो आणि खूप लाज वाटते, असं झोंग यांनी म्हटलं आहे.

Web Title: Guizhou Governor Zhong Yang known as the Beautiful Governor in China has been sentenced to 13 years in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.