चीनमध्ये गुराख्याला सापडला ७.८५ किलो सोन्याचा गोळा

By admin | Published: February 7, 2015 02:43 AM2015-02-07T02:43:56+5:302015-02-07T02:43:56+5:30

चीनच्या गुराख्याला पश्चिम शिनजियांग या स्वायत्त प्रांतात खुल्या मैदानावर ७.८५ किलो वजनाचा सोन्याचा गोळा सापडला.

Gumna found 7.85 kg of gold collected in China | चीनमध्ये गुराख्याला सापडला ७.८५ किलो सोन्याचा गोळा

चीनमध्ये गुराख्याला सापडला ७.८५ किलो सोन्याचा गोळा

Next

बीजिंग : चीनच्या गुराख्याला पश्चिम शिनजियांग या स्वायत्त प्रांतात खुल्या मैदानावर ७.८५ किलो वजनाचा सोन्याचा गोळा सापडला.
३० जानेवारी रोजी सापडलेल्या या घबाडाची किंमत १.६ दशलक्ष युआन (२,५५,००० अमेरिकन डॉलर) आहे. बेरेक सुवूट असे या कझाक गुराख्याचे नाव आहे. ओबडधोबड आकारातील हे सोने स्टँडर्ड सोन्यापेक्षा अनेकपटींनी शुद्ध असते, असे स्थानिक तज्ज्ञाने सांगितले. हा गोळा २३ सेंटीमीटर लांब, १८ सेंटीमीटर रुंद व ८ सेंटीमीटर जाड आहे. असे गोळे ८० ते ९० टक्के शुद्ध असतात व बहुतांश वेळा असे सोने खाणीत सापडते.(वृत्तसंस्था)

Web Title: Gumna found 7.85 kg of gold collected in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.