Video : प्राग विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार! १५ ठार; जीव वाचण्यासाठी काही छतावर लपले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 11:32 PM2023-12-21T23:32:23+5:302023-12-21T23:32:43+5:30

Prague university shooting प्राग - झेक प्रजासत्ताक येथील प्राग विद्यापीठात गुरुवारी एका शूटरने ( बंदुकधारी) किमान १५ जणांना ठार केले

Gunman kills at least 15 people in Prague university shooting, Shooter kills himself, Video  | Video : प्राग विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार! १५ ठार; जीव वाचण्यासाठी काही छतावर लपले...

Video : प्राग विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार! १५ ठार; जीव वाचण्यासाठी काही छतावर लपले...

Prague university shooting प्राग  (Marathi News)  : झेक प्रजासत्ताक येथील प्राग विद्यापीठात गुरुवारी एका शूटरने ( बंदुकधारी) किमान १५ जणांना ठार केले आणि किमान २४ जणं जखमी झाले आहेत. विद्यापीठातील एका बालकनीवरून त्या व्यक्तिने अंदाधुंद गोळीबार सुरू केल्याने एकच खळबळ उडाली. लोकं सैरावैरा पळत सुटले तर अनेक जणं जीव वाचवण्यासाठी छताच्या एका बाजूला लपून बसले होते. स्थानिक पोलिस आणि प्राग आपत्कालीन सेवांनी दिलेल्या माहितीनुसार हा देशातील अत्यंत वाईट सामूहिक गोळीबार होता. 


चार्ल्स युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ आर्ट्स बिल्डिंगमध्ये जेन पलाच स्क्वेअरमध्ये दुपारी ३ नंतर ( भारतीय वेळेनुसार रात्री ९च्या सुमारास) झालेल्या गोळीबाराबाबत झेक पोलिसांनी माहिती दिली. प्रागचे महापौर बोहुस्लाव स्वोबोडा यांनी सांगितले की, "आम्हाला नेहमी वाटायचे की आमच्या देशात असे काही घडणार नाही. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. पण, दुर्दैवाने आमचे जग देखील बदलत आहे आणि येथे अशा शूटर्सची समस्या देखील उद्भवत आहे."
 


रुडॉल्फिनम गॅलरीचे संचालक पेट्र नेडोमा यांनी चेक टीव्हीला सांगितले की त्याने शूटर पाहिला आहे. "मी गॅलरीत एका तरुणाला पाहिले ज्याच्या हातात काही शस्त्र होते आणि तो मानेस ब्रिजच्या दिशेने गोळीबार करत होता.  


पोलिसांनी ओल्ड टाऊन स्क्वेअरकडे पर्यटकांना घेऊन जाणार्‍या लोकप्रिय रस्त्यासह शहराच्या व्यस्त भागात असलेला चौक आणि इमारतीला लागून असलेला परिसर बंद केला. झेक टीव्हीच्या थेट प्रक्षेपणात सायरनच्या आवाजासह अनेक रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्या दिसत होत्या. काहींच्या मते त्या शूटरने नंतर स्वतःला गोळी झाडून घेतली. 


Web Title: Gunman kills at least 15 people in Prague university shooting, Shooter kills himself, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.