गन, बॉम्ब आणि सँटेलाईट, अशी ठेवा मुलांची नावं! या देशातील सरकारचे पालकांना अजब आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 04:58 PM2022-12-02T16:58:27+5:302022-12-02T16:59:17+5:30
North Korea: उत्तर कोरिया हा देश तिथल्या प्रमुखाकडून देण्यात येणाऱ्या सनकी आणि विचित्र आदेशांसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, आता उत्तर कोरियातील आई वडिलांना एक अजब आदेश सुनावण्यात आला आहे.
उत्तर कोरिया हा देश तिथल्या प्रमुखाकडून देण्यात येणाऱ्या सनकी आणि विचित्र आदेशांसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, आता उत्तर कोरियातील आई वडिलांना एक अजब आदेश सुनावण्यात आला आहे. आपल्या मुलांना बॉम्ब, गन सँटेलाईट अशी नावं द्या. अशा नावांमध्ये देशभक्ती भारलेली असते, असे उत्तर कोरियन अधिकाऱ्यांनी सांगितले.सरकारच्या मते काही नावे खूपच सौम्य आहेत.यापूर्वी दक्षिण कोरिया प्रमाणे ए आरसारख्या शब्दांच्या वापराची परवानगी दिली होती. मात्र आता सरकारने अशी नावं असलेल्या व्यक्तींनी अधिक देशभक्त आणि वैचारिक नावं द्यावीत अशी सूचना दिली आहे.
पालकांनी आपल्या मुलांना ही नावे द्यावीत, अस सल्ला किम जोंग उन यांनी दिला आहे. तसेच जो कुणी या आदेशाचं पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या नावांमध्ये Pok II (बॉम्ब), Chung Sim (निष्ठा), Ui Song (सँटेलाईट) या नावांचा समावेश आहे.
रेडिओ फ्री एशियाशी बोलताना एका नागरिकाने सांगितले की, सत्ताधाऱ्यांना हवी असलेली नावं ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव आणला जात आहे. या आदेशानुसार नाव बदलण्यासाठी लोकांकडे या वर्षाच्या अखेरपर्यंतचा अवधी आहे.
या आदेशामध्ये नागरिकांना सांगण्यात आले की क्रांतिकारी प्रतिकांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या नावांचे राजकीय अर्थ निघाले पाहिजेत. सरकारच्या या आदेशामुळे आई वडील संतप्त आहे. तसेच नाव बदलायला घाबरत आहे. कुठल्याही देशात नागरिकांना नाव बदलण्याचं स्वातंत्र कसं काय मिळू शकत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, नॉर्थ कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर कोरियातील नागरिकांची नावं ही दक्षिण कोरियातील नावांशी मिळतीजुळती असता कामा नये.