महिलेने जिममध्ये उचलले 180 किलो वजन, दबल्याने काही सेकंदातच झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 02:56 PM2022-02-24T14:56:11+5:302022-02-24T14:56:51+5:30
Gym Workout Fails: विशेष म्हणजे हे सर्व इतक्या झपाट्याने घडले की जवळ उभे असलेले लोक इच्छा असूनही महिलेला वाचवू शकले नाहीत. अपघातानंतर जिममध्ये एकच खळबळ उडाली.
असं म्हणतात की, निरोगी शरीरासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेकजण जिममध्ये जातात. पण जिममध्ये वर्कआऊट करताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे, अन्यथा आपल्याला आपला जीव गमवावा लागू शकतो. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला. जीममध्ये महिला अपघाताची बळी ठरली.
वास्तविक, मेक्सिकोमध्ये राहणारी एक महिला जीममध्ये वर्कआउट करण्यासाठी गेली होती. महिलेने उत्साहाने अधिक वजन उचलण्यास सुरुवात केली, त्यामुळे एक वेदनादायक अपघात झाला. 180 किलो वजनाच्या बारबेलखाली दबल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलीसमोर हा अपघात झाला.
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, महिला आपल्या मुलीसोबत फिटनेस सेंटर म्हणजेच जिममध्ये गेली होती. जिममध्ये तिने 180 किलो वजनाचा बारबेल उचलण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्याच क्षणी ती खाली पडली. महिला खाली पडताच 180 किलो वजनाचा बारबेल थेट तिच्या मानेवर पडला, त्यामुळे तिची मान दाबली गेली. काही सेकंदांनंतर महिलेचा मृत्यू झाला.
Mum's attempt to lift 180kg barbell the weight of a gorilla ends in tragic deathhttps://t.co/OlsJtI2iHVpic.twitter.com/tq2Q3jId6X
— Daily Star (@dailystar) February 23, 2022
विशेष म्हणजे हे सर्व इतक्या झपाट्याने घडले की जवळ उभे असलेले लोक इच्छा असूनही महिलेला वाचवू शकले नाहीत. अपघातानंतर जिममध्ये एकच खळबळ उडाली. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. 21 फेब्रुवारीला घडलेली ही घटना जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सध्या तरी या महिलेचे नाव उघड करण्यात आलेले नाही. मात्र महिलेचे वय 35 ते 40 दरम्यान असल्याचे निश्चितपणे सांगण्यात आले. व्हिडिओमध्ये 180 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात महिला बारबेलच्या सहाय्याने खाली कशी पडते हे दिसत आहे. अपघाताच्या वेळी महिलेची मुलगी जवळच उभी होती. तिने आपल्या आईला डोळ्यासमोर मरताना पाहिले. रिपोर्टनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.