एच-१ बी व्हिसा अर्ज एप्रिलपासून स्वीकारणार

By admin | Published: March 18, 2016 02:04 AM2016-03-18T02:04:20+5:302016-03-18T02:04:20+5:30

पुढील महिन्याच्या प्रारंभापासून २०१७ या वित्तीय वर्षासाठी अमेरिका उच्च कुशल कर्मचाऱ्यांसाठी लोकप्रिय एच-१ बी वर्क व्हिसासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करणार आहे.

The H-1B visa application will be accepted from April | एच-१ बी व्हिसा अर्ज एप्रिलपासून स्वीकारणार

एच-१ बी व्हिसा अर्ज एप्रिलपासून स्वीकारणार

Next

वॉशिंग्टन : पुढील महिन्याच्या प्रारंभापासून २०१७ या वित्तीय वर्षासाठी अमेरिका उच्च कुशल कर्मचाऱ्यांसाठी लोकप्रिय एच-१ बी वर्क व्हिसासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करणार आहे.
विज्ञान, अभियांत्रिकी आणि कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग यासारख्या विशिष्ट तंत्राची आवश्यकता असणाऱ्या क्षेत्रात अमेरिकी कंपन्या विदेशी कर्मचारी नियुक्त करण्यासाठी एच-१ बी व्हिसा प्रणालीचा उपयोग करतात. १ आॅक्टोबर २०१७ पासून सुरू होणाऱ्या वित्तीय वर्षासाठी संसदेने ६५ हजार एच-१ बी व्हिसाच्या मर्यादेत कोणताही बदल केलेला नाही. अमेरिकी मास्टर्स डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेणाऱ्या व या व्हिसासाठी पहिले अर्ज करणाऱ्या २० हजार जणांना या ६५ हजारांच्या मर्यादेतून वगळण्यात आले आहे.

Web Title: The H-1B visa application will be accepted from April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.