हॅकरने लॉक केलं अख्खं हॉटेल, उकळली खंडणी

By admin | Published: February 1, 2017 05:23 PM2017-02-01T17:23:16+5:302017-02-01T17:23:16+5:30

हॉटेलला हॅकरने लॉक करून खंडणी उकळल्याची घटना समोर, लेकसाइड अल्पाईन या हॉटेलला हॅकरने केलं लॉक

Hacker locked hotel, boiled ransom | हॅकरने लॉक केलं अख्खं हॉटेल, उकळली खंडणी

हॅकरने लॉक केलं अख्खं हॉटेल, उकळली खंडणी

Next
>ऑनलाइन लोकमत
व्हिएना, दि. 1 - ऑस्ट्रियामधील हॉटेलला हॅकरने लॉक करून खंडणी उकळल्याची घटना समोर आली आहे.  लेकसाइड अल्पाईन या हॉटेलला हॅकरने लॉक केलं होतं. हॅकरने इमेल करून बंदी केलेल्यांना सोडवण्यासाठी खंडणीची मागणी केली. सुदैवाने त्यावेळी हॉटेलमध्ये जास्त लोकं नव्हते. मात्र, हॅकरने हॉटेलची प्रत्येक रूम लॉक केल्याने सर्वजण अडकले होते.  इलेक्ट्रॉनिक चावीची व्यवस्था असल्यामुळे हॅकरने कंम्प्युटरला हॅक करून हॉटेल लॉक केलं.
 
22 जानेवारी रोजी ही घटना घडली. हॅकरने 1 कोटी 21 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती.  दिवस संपण्यापूर्वी जर खंडणीची रक्कम नाही दिली तर डबल रक्कमची मागणी करण्यात येईल अशी धमकी हॅकरने दिली होती.   बिटकॉइनच्या स्वरूपात हॅकरने खंडणीची रक्कम जमा करण्यास सांगितलं होतं. बिटकॉइन ही डिजिटल करन्सी आहे आणि याला ट्रेस करणं अत्यंत कठीण असतं.  
हॉटेलच्या कर्मचा-यांनी नवी इलेक्ट्रॉनिक चावी बनवून लॉक उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही. त्यामुळे हॅकर्सची मागणी मानण्याशिवाय हॉटेल प्रशासनाकडे पर्याय नव्हता, अखेर मागितलेली खंडणी हॅकरला देण्यात आली.  हॅकरने  रॅंसमवेअर नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर केला होता अशी माहिती सायबर क्राइमच्या सुरक्षा अधिका-यांनी दिली. 
 
अशाप्रकारचे हॅकर्स रशीया आणि पूर्व युरोपमध्ये जास्त सक्रिय आहेत. अशा तंत्रज्ञानाचा वापर गेल्या काही वर्षांपासून वाढलाय, इंटरनेटच्या सहाय्याने कोणत्याही गोष्टीचं स्विच ऑन किंवा ऑफ केलं जाऊ शकतं.  असं गेल्या 15 वर्षांपासून सायबर क्राइमच्या घटना तपासणा-या एका ब्रिटीश अधिका-याने सांगितलं. 

Web Title: Hacker locked hotel, boiled ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.