पाकिस्तानवर मोठा सायबर हल्ला, हॅकर्सनं बँकांची खाती हॅक करून लुटले कोट्यवधी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 10:38 PM2018-11-06T22:38:12+5:302018-11-06T22:39:18+5:30
पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहे. त्यात आता पाकिस्तानी बँकांवर हॅकर्सनं डल्ला मारला आहे.
इस्लामाबाद- पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहे. त्यात आता पाकिस्तानी बँकांवर हॅकर्सनं डल्ला मारला आहे. पाकिस्तानमधल्या बँकांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. डॉनच्या रिपोर्टनुसार, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी(FIA)नं ही माहिती दिली आहे. सुरक्षेचा घेरा तोडून या हॅकर्सनं पाकिस्तानातल्या जवळपास सर्वच बँकांवर हात साफ केला आहे. सायबर सुरक्षा विभागाचे प्रमुख मोहम्मद शोएब म्हणाले, पाकिस्तानातील जवळपास सर्वच बँकांचा डेटा हॅक करण्यात आला आहे. सायबर हल्ला सीमेपलिकडून करण्यात आला आहे. खातेधारकांच्या खात्यातून कोट्यवधी रुपये लंपास करण्यात आले आहेत.
'Almost all' #Pakistani banks hacked in security breach, says Federal Investigation Agency (FIA) cybercrime head: Dawn pic.twitter.com/tSaQE3ilZo
— ANI (@ANI) November 6, 2018