हॅकर्सने चोरले दहा कोटी डॉलर
By admin | Published: March 16, 2016 08:39 AM2016-03-16T08:39:50+5:302016-03-16T08:39:50+5:30
बांगलादेशातील केंद्रीय बँकेचे गव्हर्नर अतिउर रहमान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेच्या विदेशी खात्यातून हॅकर्सने दहा कोटी डॉलर काढून घेतल्यानंतर
ढाका : बांगलादेशातील केंद्रीय बँकेचे गव्हर्नर अतिउर रहमान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेच्या विदेशी खात्यातून हॅकर्सने दहा कोटी डॉलर काढून घेतल्यानंतर रहमान यांनी हा राजीनामा दिला आहे, हे विशेष.
गव्हर्नर अतिउर रहमान यांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी रहमान यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की, देशासाठी पदाचा राजीनामा देण्यास आपण तयार आहोत. केंद्रीय बँकेने कबुली दिली होती की, न्यूयॉर्कच्या फेडरल रिझर्व्ह बँकेतील त्यांच्या खात्यातून दहा कोटी डॉलरची चोरी झाली आहे. यातील आठ कोटी डॉलर फिलिपिन्समध्ये, तर उर्वरित रक्कम श्रीलंकेत गेली.