अमेरिकेच्या दबावापुढे झुकलं पाकिस्तान, पुन्हा एकदा हाफिज सईदला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 02:34 PM2017-11-30T14:34:50+5:302017-11-30T15:27:08+5:30

भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरुन टाकण्यात आलेल्या दबावानंतर पाकिस्तानने मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे.

Hafiz Saeed arrested again after pressure from US | अमेरिकेच्या दबावापुढे झुकलं पाकिस्तान, पुन्हा एकदा हाफिज सईदला अटक

अमेरिकेच्या दबावापुढे झुकलं पाकिस्तान, पुन्हा एकदा हाफिज सईदला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पुन्हा एकदा अटकलाहोर उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात नजरकैदेतून केली होती सुटकाअमेरिकेने हाफिजला पुन्हा एकदा अटक व्हावी यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकला होता

इस्लामाबाद - भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरुन टाकण्यात आलेल्या दबावानंतर पाकिस्तानने मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. लाहोर उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात नजरकैदेतून सुटका केल्यानंतर हाफिज सईदला पुन्हा एकदा अटक करण्यात आलं आहे. मात्र कोणत्या प्रकरणाअंतर्गत हाफिज सईदवर कारवाई करण्यात आली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

भारताने हाफिज सईदच्या सुटकेनंतर नाराजी व्यक्त केली होती. यासोबतच, अमेरिकेनेही हाफिजला पुन्हा एकदा अटक व्हावी यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकला होता. अखेर अमेरिकेच्या दबावापुढे पाकिस्तान झुकलं असल्याचं बोललं जात आहे.

23 तारखेला गुरुवारी रात्री लाहोरमधील आपल्या घरकैदेतून सुटका झाली तेव्हा हाफिज सईदने केक कापून आपलं स्वातंत्र्य साजरं केलं. इतकंच नाही, हाफिज सईदच्या स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा होत असताना, पाकिस्तान सरकारमधील अधिकारी हाफिज सईदचा साहेब म्हणून उल्लेख करत होते. मुंबई दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्ष पुर्ण होत असतानाच, हाफिज सईदची सुटका झाली. हाफिज सईदचं अभिनंदन करण्यासाठी जमात-उद-दावाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. सुटका झाल्यानंतर हाफिज सईदने समर्थकांसोबत आनंद साजरा केला. हाफिज सईदचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये हाफिज केक आणि मिठाई खाताना दिसत होता. 

सुटका झाल्यानंतर हाफिज सईदने भारताविरोधातील गरळ ओकली होती. त्याने काश्मीर मुद्द्यावरुनही भारताविरोधात गरल ओकली असून, काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढच राहणार असल्याचं सांगितलं होतं. भारत आणि अमेरिकेकडून दबाव टाकण्यात आल्यानेच आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप हाफिज सईदने केला. हाफिज सईदच्या भारताची चिंता मात्र वाढली आहे. पाकिस्तानकडून सुटका झाल्यामुळे हाफिज सईद पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे.

'मी दहशतवादी नाही, दहशतवादी यादीतून नाव काढा'
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने दहशतवाद्यांच्या यादीतून आपलं नाव हटवण्यात यावं अशी मागणी संयुक्त राष्ट्राकडे केली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीतून आपलं नाव वगळण्यात यावं यासाठी हाफिज सईदने संयुक्त राष्ट्राकडे याचिका दाखल केली आहे. हाफिज सईदने लाहोरमधील एका लॉ फर्मच्या माध्यमातून ही याचिका पाठवली आहे. हाफिज सईद घरकैदेत होता तेव्हाच ही याचिका करण्यात आली. 

संयुक्त राष्ट्राने  मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर डिसेंबर 2008 रोजी हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. मुंबई दहशतवादी हल्ल्यात एकूण 166 जणांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी कारवायांबद्दल हाफिज सईदवर 10 दशलक्ष डॉलरचे बक्षिस आहे. गेल्याच आठवड्यात पाकिस्तानने 297 दिवसानंतर हाफिज सईदची घरकैदेतून सुटका केली आहे. 
 

Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com

Web Title: Hafiz Saeed arrested again after pressure from US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.