हाफिजला का पाळलंय? शरीफना पक्षाकडून घरचा अहेर
By admin | Published: October 7, 2016 10:58 AM2016-10-07T10:58:56+5:302016-10-07T11:21:10+5:30
कुख्यात दहशतवादी हाफिज सईद आणि अन्य दहशतवाद्यांविरोधात कारवाई का होत नाही? हाफिज सईद अशी कोणती अंडी देत आहे, म्हणून त्याला आपण पाळून ठेवला आहे?
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 7- मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदविरोधात कारवाई होत नसल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पक्षांतर्गतच रोषाला सामोरे जावे लागत आहे. कुख्यात दहशतवादी हाफिज सईद आणि अन्य दहशतवाद्यांविरोधात कारवाई का होत नाही? हाफिज सईद अशी कोणती अंडी देत आहे, म्हणून त्याला आपण पाळून ठेवला आहे? असे प्रश्न विचारत शरीफ यांच्याच पक्षातील खासदार राणा मोहम्मद अफजल यांनी हल्लाबोल चढवला आहे. एकप्रकारे या खासदाराने शरीफ यांना घरचा अहेर दिला आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानमध्ये गुरुवारी परराष्ट्र व्यवहार समितीची बैठक झाली. जागतिक पातळीवर पाकिस्तानसमोर निर्माण झालेल्या अडचणींसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान, खासदार राणा मोहम्मद अफजल यांनी आपल्याच सरकारवर नाराजी व्यक्त करत, 'आजपर्यंत आपण हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करू शकलो नाही. भारत याच मुद्याचा फायदा घेत जागतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करू पाहत आहे. सईदसारख्या दहशतवाद्यांच्या विषयामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध देखील ताणले जात आहेत. असे देखील अफजल यांनी यावेळी नमूद केले.
आणखी बातम्या
डॉनच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पडण्याची भीती देखील पाकिस्तानने व्यक्त केली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांविरोधात सरकारद्वारे करण्यात येणा-या कारवाईमध्ये गुप्तचर यंत्रणा हस्तक्षेप करणार नाही, असा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आल्याचे माहिती मिळत आहे.