हाफीजचे दवाखाने सरकारच्या ताब्यात, कार्यालयांवर कारवाईला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 01:38 AM2018-02-15T01:38:02+5:302018-02-15T01:38:13+5:30
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याचा संबंध असलेले दवाखाने व शिक्षणसंस्थांवर पाकिस्तान सरकारने कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे.
इस्लामाबाद : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याचा संबंध असलेले दवाखाने व शिक्षणसंस्थांवर पाकिस्तान सरकारने कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. पंजाब सरकारने दिलेल्या आदेशानुसार, रावळपिंडीच्या जिल्हा प्रशासनाने हाफीज सईदशी संबंधित जमात-उद दावा (जेयूडी) आणि फलाह-इ इन्सानियत फाउंडेशन (एफआयआय) या संस्थांच्या वतीने चालविण्यात येणारे चार दवाखाने नियंत्रणात घेतले आहेत, तर संबंधित विद्यालये जिल्ह्याच्या वक्फ बोर्डाच्या ताब्यात दिली आहेत.
सरकारने जिल्हा प्रशासनाला विद्यालयातील विद्यार्थी, दवाखान्यातील डॉक्टर्स, परिचारिका यांची कसून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पॅरिसमध्ये
१८ ते २३ फेब्रुवारी या काळात होणाºया यूनोच्या फायनान्शिअल अॅक्शन
टास्क फोर्सची बैठक होत आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात
हाफीज सईदच्या संबंधित संस्थांच्या देशभर पसरलेल्या कार्यालयांवर कारवाईला वेग आला आहे. (वृत्तसंस्था)