हाफीजच्या संघटना जाणार काळ्या यादीत; यूनोच्या दबावाला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 02:18 AM2018-02-14T02:18:27+5:302018-02-14T02:18:35+5:30
पाकिस्तानने दहशतवादविरोधी कायद्यात सुधारणा केल्याने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदशी संबंधित धर्मादाय संस्थांना काळ््या यादीत टाकण्याचा अधिकार सरकारला मिळाला आहे. हाफीज सईद जमात-ऊद-दावा व फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन या संस्था चालवतो.
इस्लामाबाद : पाकिस्तानने दहशतवादविरोधी कायद्यात सुधारणा केल्याने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदशी संबंधित धर्मादाय संस्थांना काळ््या यादीत टाकण्याचा अधिकार सरकारला मिळाला आहे. हाफीज सईद जमात-ऊद-दावा व फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन या संस्था चालवतो. या संस्था ‘लश्कर- ए- तयब्बा’च्या दहशतवादी आघाड्या असल्याने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्यांना बेकायदा ठरवले आहे.
एलईटीची स्थापना सईदने ३० वर्षांपूर्वी स्थापन केली. मुंबईत झालेला हल्ला एलईटीने केला होता, असा ठपका ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुस्सेन यांनी नुकतीच कायद्यात दुरुस्तीला मंजुरी दिली व सरकारने ही दुरुस्ती सोमवारी जाहीर केली.
बंदी घातलेल्या संघटना धर्मादाय कार्यक्रम करून देणग्या गोळा करायच्या. हाफीजशी संबंधित गटांसह अशा संघटनांना मिळणारा पैसा बंद करण्यास पाकिस्तानने केलेल्या प्रयत्नांची समीक्षा करण्यासाठी वित्तीय कृती दलाचीे बैठक पॅरिसमध्ये झाल्यानंतर पाकिस्तानने कायद्यात दुरुस्ती केली. हाफीजवर अमेरिकेने १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. अनेक महिने नजरकैदेत ठेवून सईदला गेल्या नोव्हेंबरात न्यायालयाने सोडून दिले होते.