10 वर्षानंतर हैती हदरलं, 7.2 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत 227 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 09:11 AM2021-08-15T09:11:15+5:302021-08-15T09:13:11+5:30
Earthquake Hits Haiti: या तीव्र भूकंपात अनेक शहरातील इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.
पोर्ट-अउ-प्रिंस: 10 वर्षानंतर कॅरेबियन देश हैती भूकंपानं हदरलं. या भूकंपात हैतीमधील अनेक शहरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हैतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, या भूकंपात आतापर्यंत 227 नागरिकांचा मृत्यू झालाय तर शेकडो जखमी आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Haiti earthquake: Death toll rises to 227
— ANI Digital (@ani_digital) August 14, 2021
Read @ANI story | https://t.co/l2tiP7RCrU#Haiti#earthquakepic.twitter.com/KqixP9x3pU
हैतीचे नागरिक सुरक्षा संचालक जेरी चांडलरने सांगितल्यानुसार, भूकंपामुळे जेरेमी, लेस केयस, सेंट लुइस डू सूद आणि लेस एंग्लिस शहरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरे जमीनदोस्त झाल्यामुळे शेकडो लोकांचा संसार उघड्यावर पडलाय. नॅशनल सेंटर ऑफ सीस्मोलॉजीने या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल असल्याची माहिती दिली आहे. तर, भूकंपाचे केंद्र पोर्ट-औ-प्रिंस पासून पश्चिम दिशेकडे 118 किलोमीटर दूरवर आहे.
अमेरिकेत जाणवले हदरे
दरम्यान, हैतीमधील भूकंपादरम्यान तिकडे अमेरिकेतील अलास्कामध्येही 6.9 तीव्रतेचे भूकंपाचे हदरे जाणवले आहेत. अलास्कात सायंकाळी 5.27 वाजता भूकंप आला. पण, अद्याप कुठल्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. तर, तिकडे पूर्व क्यूबा आणि जमैकामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.