हाजी सय्यद सलमान चिश्ती यांना राजदूतपद बहाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 02:21 PM2024-05-23T14:21:13+5:302024-05-23T14:21:28+5:30
जगातील शांतता, सहिष्णुता, एकजूट वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ७२/१३० या प्रस्तावाद्वारे शांततामय सहजीवन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जिनिव्हा येथे आयोजित एका कार्यक्रमात हाजी सय्यद सलमान चिश्ती यांना सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी आणखी काही नामवंतांचाही सत्कार करण्यात आला.
जिनिव्हा : संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी १६ मे रोजी शांततामय सहजीवन आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी या दिनानिमित्त दरगाह अजमेर शरीफचे प्रमुख व चिश्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी सय्यद सलमान चिश्ती यांची राजदूत म्हणून निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
जगातील शांतता, सहिष्णुता, एकजूट वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ७२/१३० या प्रस्तावाद्वारे शांततामय सहजीवन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जिनिव्हा येथे आयोजित एका कार्यक्रमात हाजी सय्यद सलमान चिश्ती यांना सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी आणखी काही नामवंतांचाही सत्कार करण्यात आला.
‘शांतता, ऐक्य यांचा प्रसार करत राहणार’
चिश्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष असलेले हाजी सय्यद सलमान चिश्ती हे आंतरधर्मीय सद्भाव व जागतिक शांतता या तत्वांचा प्रसार केला आहे. त्यांनी भारतासह १००हून अधिक देशांत सांप्रदायिक सद्भाव, सामाजिक न्याय, सांस्कृतिक मूल्ये या तत्वांचा प्रचार व प्रसार केला. हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले की, जगात शांतता व ऐक्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी कार्य करत राहिले पाहिजे. कोणाशीही भेदभाव न करण्याची शिकवण भारताने दिली आहे. त्याचा प्रसार साऱ्या जगात करण्याचे काम यापुढे करत राहीन.