१६ फूट लांब अर्धा डझन शार्कने एका व्यक्तीवर केला हल्ला, मग जे झालं ते हैराण करणार होतं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 03:32 PM2021-10-29T15:32:28+5:302021-10-29T15:36:03+5:30
आपली हिंमत आणि बहादुरीच्या जोरावर तो त्यांच्या मधून सुखरूप सुटला. इतकंच नाही तर यासाठी त्याने केवळ एका हाताचा वापर केला.
समुद्राच्या खोलात १६ फूट लांब विशाल शार्कचा सामना होणंही मृत्यूला आमंत्रण आहे. मग जरा विचार करा की अशा खतरनाक अर्धा डझन शार्क (Giant Shark) एकदम जवळ आल्या तर काय होईल? मेक्सिकोच्या (Mexico) ग्वाडालूप (Guadalupe Island) बेटावर समुद्रात उतरलेल्या डायवर विकीसोबत असंच झालं. पण आपली हिंमत आणि बहादुरीच्या जोरावर तो त्यांच्या मधून सुखरूप सुटला. इतकंच नाही तर यासाठी त्याने केवळ एका हाताचा वापर केला.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार डायवर डिकी एक कटेंनरमध्ये होता आणि मेगा शार्कला बघण्यासाठी समुद्रात गेला होता. पण त्याला हे माहीत नव्हतं की, ज्या शार्कना बघण्यासाठी तो एवढ्या उत्सुकतेने जात आहे, त्यांच्या मधून परत येणं त्याच्यासाठी जवळपास अशक्य होतं.
डिकी ज्या कटेंनरमध्ये होता आधी त्या कंटेनरला दोन शार्कने वेढा दिला. या दोन्ही शार्क ४ ते ५ मीटर लांब होत्या. नंतर या शार्कने कंटेनरवर हल्ला केला. या हल्ल्यात एका शार्कचं नाक कंटेनरमध्ये अडकलं. यानंतर डिकीची वाचण्याची शक्यता अजिबात नव्हती. यादरम्यान शार्कची संख्या वाढली आणि डिकीच्या कंटेनरला अर्धा डझन शार्कने वेढा दिला.
डिकीने सांगितलं की, शार्कची संख्या यापेक्षा जास्त असू शकली असती. पण तो त्यावेळी अशा स्थितीत होता की, त्याला खाली बघायला संधी मिळाली नाही. कंटेनरमध्ये शार्कचं नाक अडकल्याने जे छिद्र झालं होतं ते बंद करण्यासाठी डिकीने एका कार्डचा आधार घेतला. एक हात धरून ठेवला. बराच वेळ तो याच स्थितीत होता. मोठ्या प्रयत्नांनंतर तो तिथून वाचला.