इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 10:13 PM2024-10-17T22:13:41+5:302024-10-17T22:14:02+5:30
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
Israel-Hamas War :इस्रायल आणि हमास यांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून भीषण संघर्ष सुरू आहे. या संघर्षात इस्रायलच्या हाती मोठे यश आले आहे. इस्रायली सैन्याने हमास प्रमुख याह्या सिनवार याला अखेर ठार केले आहे. आयडीएफच्या माहितीनुसार, इस्रायलने गाझात केलेल्या हल्ल्यात हमासचे 3 दहशतवादी मारले गेले, ज्यात याह्या सिनवार याचाही समावेश होता. डीएनए चाचणीतून याची पुष्टी झाली आहे. सिनवार हा इस्रायलवर ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि हमासचा प्रमुख होता.
During IDF operations in Gaza, 3 terrorists were eliminated. The IDF and ISA are checking the possibility that one of the terrorists was Yahya Sinwar. At this stage, the identity of the terrorists cannot be confirmed.
— Israel Defense Forces (@IDF) October 17, 2024
In the building where the terrorists were eliminated, there…
यापूर्वी IDF ने एक निवेदन जारी केले होते, ज्यात गाझामध्ये 3 दहशतवादी ठार झाल्याची माहिती दिली होती. आता यातील एक याह्या सिनवार असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, सिनवारला यावर्षी ऑगस्टमध्ये हमासचा प्रमुख बनवण्यात आले होते. 31 जुलै रोजी तेहरानमध्ये इस्माईल हानियाच्या मृत्यूनंतर याह्या सिनवार याच्याकडे हमासची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
तीन महिन्यांत तीन मोठे शत्रू मारले!
गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासने दक्षिण इस्रायलवर मोठा हल्ला केला होता, ज्यामध्ये सुमारे 1200 इस्रायली मारले गेले होते. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, हमासच्या या संपूर्ण हल्ल्याचा सिनवार हा मुख्य सूत्रधार होता. त्याची हत्या हा इस्रायलचा मोठा विजय आहे. यापूर्वी 27 सप्टेंबर रोजी इस्रायलने लेबनॉनमधील बेरूत येथे हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाहला ठार केले होते. अशाप्रकारे, केवळ 3 महिन्यांत इस्रायलने आपल्या 3 सर्वात मोठ्या शत्रूंना ठार केले आहे.