हमास कमांडरचे ऑडिओ, लाईव्ह फुटेज आले समोर; गाझा हॉस्पिटल हल्ल्याबाबत इस्रायलने पुरावे सादर केले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 10:53 AM2023-10-19T10:53:41+5:302023-10-19T10:55:55+5:30

काल गाझामधील एका रुग्णालयावर मोठा हल्ला झाला, या हल्ल्यात ५०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Hamas commander's audio, live footage surfaced; Israel presents evidence on Gaza hospital attack | हमास कमांडरचे ऑडिओ, लाईव्ह फुटेज आले समोर; गाझा हॉस्पिटल हल्ल्याबाबत इस्रायलने पुरावे सादर केले

हमास कमांडरचे ऑडिओ, लाईव्ह फुटेज आले समोर; गाझा हॉस्पिटल हल्ल्याबाबत इस्रायलने पुरावे सादर केले

इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या काही दिवसापासून युद्ध सुरू आहे. काल बुधवारी हमास येथील एका रुग्णालयावर मोठा हल्ला झाला. या हल्ल्यात ५०० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, या हल्ल्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पॅलेस्टाईन आणि हमासने इस्रायलने हॉस्पिटलवर बॉम्बफेक केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे  पॅलेस्टाईनच्या इस्लामिक जिहादने डागलेले रॉकेट चुकीचे फायर करून हॉस्पिटलवर पडल्याचा दावा इस्रायलने केला आहे. आता या संदर्भात आणखी एक  मोठी अपडेट समोर आली आहे, आता इस्रायलने अनेक पुरावेही सादर केले आहेत. इस्रायलने हमासचा ऑडिओ जारी केला.

बायडेन यांची इस्रायलला भेट, रॉकेट हल्ले वाढले; आता ऋषि सुनकही Israel दौऱ्यावर जाणार

हा हल्ला आपण केला नसल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. हमासच्या सैनिकांचा एक ऑडिओ प्रसिद्ध केला आहे. हा ऑडिओ हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतरचा असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. यामध्ये पॅलेस्टाईन इस्लामिक जिहादचे रॉकेट चुकीचे फायर होऊन हॉस्पिटलवर पडल्याचे दोन हमासचे सैनिक बोलत आहेत. हे इस्रायलचे रॉकेट नसून आमचे आहे, असे आपापसात बोलताना ऐकायला मिळत आहे.

इस्रायलच्या हवाई दलाने एक फुटेजही जारी केले आहे. यामध्ये रुग्णालयावरील हल्ल्यापूर्वी आणि नंतरचे चित्र आहे. रॉकेट चुकून हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये पडले. यामध्ये इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनेने हे रॉकेट डागल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या तळांचा व्हिडीओ जारी केला आहे. गाझा पट्टीमध्ये हमासचे तळ दाट लोकवस्तीच्या भागात असल्याचे सांगण्यात आले आहे. येथून ते इस्रायलवर हल्ला करण्यासाठी रॉकेट डागत आहेत. हमासने डागलेली अनेक रॉकेट आपल्या हद्दीत पडल्याने आपले सर्वात मोठे नुकसान झाले असल्याचा इस्रायलचा दावा आहे .

इस्रायलने एक व्हिडीओ फुटेजही जारी केला आहे. हा त्याच रॉकेटचा व्हिडीओ आहे जो मिस फायर होऊन हॉस्पिटलवर पडला. इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक जिहादने संध्याकाळी ६.५९ वाजता रॉकेट डागले, यावेळी गाझा येथील रुग्णालयात स्फोट झाला.

Web Title: Hamas commander's audio, live footage surfaced; Israel presents evidence on Gaza hospital attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.