हमासकडून इस्रायलच्या वाहनांचा विध्वंस सुरू, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी पलायन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 06:24 AM2023-11-10T06:24:58+5:302023-11-10T06:59:30+5:30
इस्रायलमधील ऐशदाद शहरावरही हमासने रॉकेटचा मारा केला.
गाझा : गाझा शहरातील उत्तर भागात हमासचे प्राबल्य असलेल्या विभागावर कब्जा केल्याचा इस्रायलने दावा केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना हमासची लष्करी संघटना अल-कासमने म्हटले आहे की, आम्ही तीन इस्रायली लष्करी वाहने व बुलडोझर नष्ट केला आहे. त्यामध्ये इस्रायलच्या दोन रणगाड्यांचा समावेश आहे. इस्रायलने हमासच्या ठिकाणांवर बॉम्बहल्ले करणे सुरूच ठेवले आहे. इस्रायलमधील ऐशदाद शहरावरही हमासने रॉकेटचा मारा केला.
अमेरिकेचे हवाई हल्ले
वॉशिंग्टन : सिरियाच्या पूर्व भागातील सीमेनजीक असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी नुकतेच जोरदार हल्ले केले. अमेरिकेच्या एफ-१५ लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळावर तसेच शस्त्रागारावर हल्ला चढविला. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी सांगितले की, अमेरिकेचे लष्कर, नागरिक यांच्या सुरक्षेला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारने नेहमीच प्राधान्य दिले
आहे.