हमास लष्करप्रमुखाची पत्नी, मुलगा ठार
By admin | Published: August 20, 2014 11:16 PM2014-08-20T23:16:46+5:302014-08-20T23:16:46+5:30
इस्रायलने दहा दिवसांच्या शांततेनंतर बुधवारी सकाळी गाझावर पुन्हा हल्ले सुरू केले. यात हमासच्या लष्करप्रमुखाची पत्नी, मुलासह 11 पॅलेस्टिनी मारले गेले.
Next
गाझा/जेरुसलेम : इस्रायलने दहा दिवसांच्या शांततेनंतर बुधवारी सकाळी गाझावर पुन्हा हल्ले सुरू केले. यात हमासच्या लष्करप्रमुखाची पत्नी, मुलासह 11 पॅलेस्टिनी मारले गेले.
या संघर्षातील बळींची संख्या 21क्क् वर पोहोचली आहे. इजिप्तची राजधानी कैरोतील चर्चेतूनही कोणताही निष्कर्ष निघू शकला नाही. गाझावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा प्रमुख मोहंमद दैफ याची पत्नी आणि मुलगा मारला गेल्याचे वृत्त आहे. गाझातून मंगळवारी 5क् आणि बुधवारी 2क् रॉकेटस्चा मारा करण्यात आला, असे इस्रायलने म्हटले आहे. मात्र, या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. हंगामी शस्त्रसंधी संपुष्टात येण्याच्या काही तास आधीच संघर्ष पुन्हा सुरू झाला होता. हिंसाचार संपुष्टात आणण्यासाठी कैरोतील चर्चा निष्फळ ठरली. इस्रायली प्रतिनिधींनी आपण मायदेशी परतणार असल्याचे सांगितले. इस्रायलने केलेल्या हल्ल्यातून दैफ बचावले किंवा नाही हे समजू शकले नाही. इस्रायलमध्ये आत्मघाती हल्ल्यांचा आदेश देणारे दैफ यांच्यावर अनेकदा प्राणघातक हल्ले झाले आहेत. दैफ यांचे कुटुंबिय मारले गेल्याचे समजताच रुग्णालयात नागरिकांनी गर्दी झाली होती. (वृत्तसंस्था)