"Whatsapp वर पाहा तांडव, मी दहा यहूदी मारले!" आई-वडीलही खूश होतात अन्...; IDFनं जारी केला ऑडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 01:45 PM2023-10-25T13:45:55+5:302023-10-25T13:49:36+5:30

या फोन रेकॉर्डिंगमध्ये हमासचा दहशतवादी आणि त्याचे आई-वडील यांचा संवाद आहे. यात एक दहशतवादी आपल्या हाताने दहा यहुदींना मारल्याचा दावा करत आहे. 

Hamas terrorist says Papa I killed 10 Jews open whatsapp and watch death of israeli Parents are also happy Audio released by the IDF | "Whatsapp वर पाहा तांडव, मी दहा यहूदी मारले!" आई-वडीलही खूश होतात अन्...; IDFनं जारी केला ऑडिओ

"Whatsapp वर पाहा तांडव, मी दहा यहूदी मारले!" आई-वडीलही खूश होतात अन्...; IDFनं जारी केला ऑडिओ

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेले हे युद्ध थांबवावे असे आवाहन संयुक्त राष्ट्राने इस्रायलला केले आहे. मात्र, इजरायल यास नकार दिला आहे. यानंतर, इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन म्हणाले, "ज्यांनी आपले अस्तित्वच नष्ट करण्याची आणि उद्धवस्त करण्याची शपथ घेतली असेल, अशा व्यक्तीसोबत युद्धविरामासाठी आपण कसे तयार होऊ शकतो?"

यातच, इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने एक्सवर हमासच्या दहशतवाद्याचे एक फोन रिकॉर्डिंग शेअर केले आहे. या फोन रेकॉर्डिंगमध्ये हमासचा दहशतवादी आणि त्याचे आई-वडील यांचा संवाद आहे. यात एक दहशतवादी आपल्या हाताने दहा यहुदींना मारल्याचा दावा करत आहे. 

'तुमच्या मुलाने यहूदींना मारले आहे' -
हमासच्या दहशतवाद्याने म्हटले आहे की, त्याने एका युहुदी महिलेकडून तिचा फोन घेऊन तिची हत्या केली. तो सध्या किबुत्झच्या मेफल्सिम भागात आहे. तो त्याच्या वडिलांना सातत्याने व्हॉटअॅप बघायला सांगत आहे. ज्यात त्याने केलेल्या कथित १० हत्या दाखवण्याची त्याची इच्छा आहे. तो म्हणत आहे, "बघा मी माझ्या हाताने किती लोकांना मारले. तुमच्या मुलाने यहूदींना मारून टाकले."

त्याने दहा लोकांना मारल्याचे, तो त्याच्या वडिलांना वारंवार सांगत आहे. यात, त्याने ज्या महिलेकडून फोन हिस्कावला, त्या महिलेच्या पतिला मारल्याचेही तो सांगत आहे. त्याचे बोलणे ऐकूण त्याचे आई-वडील खूश होतात आणि दोघेही म्हणतात, "अल्लाह तुला आशीर्वाद दओ, लवकर घरी ये. यावर दहशतवादी म्हणतो, "घरी परत यायचे नाही, एकतर मृत्यू मिळेल, नाही तर विजय मिळेल."
 

Web Title: Hamas terrorist says Papa I killed 10 Jews open whatsapp and watch death of israeli Parents are also happy Audio released by the IDF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.