एका रॉकेटच्या बदल्यात एका ओलिसाला फासावर लटकवू, हमासची इस्राइलला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 08:37 AM2023-10-10T08:37:23+5:302023-10-10T08:37:46+5:30
इस्राइल आणि पॅलेस्टाईनमध्ये अनेक दशकांपासून सुरू असलेला संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. ७ ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने ...
इस्राइल आणि पॅलेस्टाईनमध्ये अनेक दशकांपासून सुरू असलेला संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. ७ ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने इस्राइलवर सुमारे ५ हजार रॉकेट डागून हल्ला केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी भयावह हल्ल्यांची मालिका सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत हमासने इस्राइलला आणखी गंभीर हल्ल्याची धमकी दिली आहे.
हमासचा प्रवक्ता अबू ओबेदा याने सांगितले की, गाझापट्टीवर इस्राइलकडून डागण्यात येणाऱ्या प्रत्येक रॉकेटच्या बदल्यात पॅलेस्टाइनमध्ये इस्राइलच्या एका ओलिसाला सार्वजनिकपणे ठार मारलं जाईल. हमासने सांगितले की, गाझापट्टीवर इस्राइलकडून डागण्यात येणाऱ्या प्रत्येक रॉकेटच्या बदल्यात इस्लाइली ओलिसांना देण्यात येणाऱ्या फाशीच्या व्हिडीओची रेकॉर्डिंग केली जाईल. तसेच नंतर हे व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट केले जातील.
इस्राइल आणि पॅलेस्टाइनमध्ये सुरू असलेल्या या संघर्षामध्ये आतापर्यंत इस्राइलमधील सुमारे ११०० लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्राइल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये भीषण लढाई सुरू आहे. दोन्हीकडून हल्ले सुरू आहेत. या संघर्षाला सुरुवात हमासच्या दहशतवाद्यांनी केली होती. त्यानंतर इस्राइलकडून त्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिलं जात आहे. इस्राइलने हमासच्या अनेक तळांना नष्ट केले आहे.