हमीद गुल तालिबानचे जनक

By admin | Published: August 16, 2015 10:18 PM2015-08-16T22:18:17+5:302015-08-16T22:18:17+5:30

काश्मीर आणि अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांचे हमीद गुल (आयएसआयचे माजी प्रमुख) हे समर्थक होते. एवढेच नाही तर त्यांनी कुख्यात

Hameed Gul Taliban's father | हमीद गुल तालिबानचे जनक

हमीद गुल तालिबानचे जनक

Next

इस्लामाबाद : काश्मीर आणि अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांचे हमीद गुल (आयएसआयचे माजी प्रमुख) हे समर्थक होते. एवढेच नाही तर त्यांनी कुख्यात दहशतवाद्यांसोबत अनेकदा एकाच व्यासपीठावर हजेरीही लावली होती. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदसोबतही अनेकदा वावरताना दिसले. तालिबानचे जनक या टोपणनावाने त्यांना पाकिस्तानात ओळखले जायचे. पाकिस्तानचे माजी हुकूमशहा झिया उल हक यांचे ते खंदे समर्थक होते. खलिस्तानवाद्यांच्या हिंसाचाराच्या प्रश्नावर आयएसआयचे प्रमुख म्हणून गुल यांनी रॉचे तत्कालीन प्रमुख ए.के. वर्मा यांनी अम्मान (जॉर्डन) आणि इंटरलाकेन (स्वीस) येथे दोनदा भेट घेतली होती. लेफ्ट. जनरल हमीद गुल (७८) यांचे शनिवारी रात्री मेंदूत रक्तस्राव झाल्याने निधन झाले.
१९८७ आणि १९८९ यादरम्यान ते आयएसआयचे प्रमुख होते. त्यावेळी सोव्हिएत संघाविरुद्ध अमेरिकेच्या पाठिंब्यावर जिहाद अंतिम टप्प्यात होता. अफगाणमधील युद्ध समाप्त झाल्यानंतरही ते गुप्तचर संस्थेत सक्रिय होते. १९७२ आणि १९७६ यादरम्यान ते तत्कालीन हुकूमशहा जन. झिया उल हक यांच्या अखत्यारीतील फलटणीचे प्रमुख होते. १९७८ मध्ये त्यांना ब्रिगेडिअर म्हणून बढती देण्यात आली होती. १९८० मध्ये पहिल्या आर्मर्ड डिव्हिजनचे (मुल्तान) कमांडर झाले. लष्कराच्या गुप्तचर विभागाचे महासंचालक म्हणून जनरल हेड क्वॉर्टरमध्ये नियुक्त करण्यात आले होते.

Web Title: Hameed Gul Taliban's father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.